हृतिकची बहीण सुनैना रोशन म्हणाली, माझं समर्थन कंगनाला!

kangana ranaut hrithik roshan 'मी त्यांच्या घरात राहत असले तरी माझा येण्या- जाण्याचा दरवाजा आणि मजला पूर्ण वेगळा आहे.'

News18 Lokmat | Updated On: Jun 19, 2019 12:45 PM IST

हृतिकची बहीण सुनैना रोशन म्हणाली, माझं समर्थन कंगनाला!

मुंबई, 19 जून- बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतची बहीण रंगोली चंडेल दरदिवशी तिच्या ट्विटर अकाउंटवरून कोणते ना कोणते खुलासे करतच असते. काही दिवसांपूर्वी हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशनने कंगना आणि तिला माफी मागण्यासाठी बोलावलं होतं. दरम्यान सुनैनैने स्वतः कंगनाचं नाव लिहित एक ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये तिने कंगनाला पाठिंबा दिल्याचं म्हटलं आहे. हृतिकची बहीण सुनैनाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक मेसेज लिहिला. आपल्या पोस्टमध्ये तिने लिहिले की, ‘मी कंगनाचं समर्थन करते.’ सुनैनाच्या या ट्वीटने हे स्पष्ट होतं की ती कंगनाच्याच बाजूने आहे. पण अजूनपर्यंत सुनैना आणि रोशन कुटुंबात नक्की कोणते वाद आहेत हे अजून कळू शकलेले नाही.

लग्नाआधी गरोदर राहिली अभिनेत्री, रस्त्यावरच केलं असं काही की लोक झाले हैराण


Loading...


याआधीही सुनैना रोशनने स्पष्ट केलं होतं की तिला कोणताही मानसिक आजार नसून ती बायपोलर डिसऑर्डरवर उपचार घेत नाही. तसेच तिच्यात आणि कुटुंबात वाद असणाऱ्या बातमीला नकार दिला नाही. तिने एका वक्तव्यात म्हटलं होतं की, नर्कात असल्यासारखं आयुष्य झालं असून कुटुंब तिला पाठिंबा देत नाही याचंही तिला वाईट वाटतं.माजी मिस इंडियासोबत झाले असे काही की तुम्हालाही येईल तिची दया

सुनैना आई- बाबा राहत असलेल्या घरात पुन्हा राहायला जाण्यापूर्वी गेल्या काही दिवसांपासून एका हॉटेलमध्ये भाड्याने राहत आहे. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत सुनैनाने स्पष्ट केलं की, 'मी त्यांच्या घरात राहत असले तरी माझा येण्या- जाण्याचा दरवाजा आणि मजला पूर्ण वेगळा आहे. हो माझ्या आणि कुटुंबामध्ये काही वाद आहेत. पण ते काय आहेत ते कृपया मला विचारू नका. शेवटी हे माझ्या कुटुंबाबद्दल आहे आणि त्यांना अजून त्रास व्हावा असं मला अजिबात वाटत नाही.'

VIDEO: बिग बी अमिताभ बच्चन यांची नात का होतेय ट्रोल?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2019 12:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...