जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: फाल्गुनीच्या गाण्यावर हृतिक रोशनही थिरकला; स्टेजवरच झाला ऑउट ऑफ कंट्रोल

VIDEO: फाल्गुनीच्या गाण्यावर हृतिक रोशनही थिरकला; स्टेजवरच झाला ऑउट ऑफ कंट्रोल

हृतिक रोशन-फाल्गुनी पाठक

हृतिक रोशन-फाल्गुनी पाठक

दरवर्षी नवरात्रीला फाल्गुनी पाठक गरबा नाईट हा कार्यक्रम आयोजित करते. या कार्यक्रमात लोक तिच्या गाण्यांवर बेधुंद नाचतात, गरबा खेळतात. यावेळी तिच्या गाण्यांची भुरळ चक्क बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनला पडली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 3 ऑक्टोबर : देशभरात नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. यावर्षी नवरात्र साजरी करण्यावर कुठलेही निर्बंध नाहीत त्यामुळे दोन वर्षांनंतर सगळीकडे नवरात्रीचा उत्साह आहे. नवरात्र म्हंटलं की गरबा आलाच आणि गरबा म्हटलं कि एक नाव हमखास डोळ्यासमोर येतं ते म्हणजे फाल्गुनी पाठक. गरबा आणि फाल्गुनी  पाठक  यांची गाणी हे  ठरलेले समीकरण आहे. दरवर्षी नवरात्रीला फाल्गुनी पाठक गरबा नाईट हा कार्यक्रम आयोजित करते. या कार्यक्रमात लोक तिच्या गाण्यांवर बेधुंद नाचतात, गरबा खेळतात. यावेळी तिच्या गाण्यांची भुरळ चक्क बॉलिवूड अभिनेत्याला पडली आहे. हा अभिनेता म्हणजेच हृतिक रोशन आहे. हृतिक रोशनचा  नुकताच  ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. त्याच्याच प्रमोशनसाठी तो फाल्गुनी पाठकच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. फाल्गुनी पाठकच्या गाण्यांवर लोक बेधुंद गरबा करत असताना हृतिक सुद्धा तिला सामील झाला. पण त्याने यावेळी या गायिकेला गरबा नाही तर स्वतःच्या गाण्यांवर नाचवलं. यावेळी पारंपरिक नृत्या व्यतिरिक्त गायिका स्वतः बॉलिवूड डान्स करताना दिसली. फाल्गुनीचा हृतिक रोशनसोबतचा डान्स व्हिडिओ समोर आला आहे. तिने स्वतः सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हेही वाचा - Adipurush Teaser :‘हा चित्रपट म्हणजे रामायणाचा अपमान’; ‘आदिपुरुष’चा टीझर पाहून असं का म्हणतायत प्रेक्षक? फाल्गुनी पाठकच्या गाण्यांवर गरबा व दांडिया करायला कोणाला आवडणार नाही. सेलिब्रिटीही यात मागे नाहीत. अभिनेता हृतिक रोशनलाही स्वत:ला रोखता आले नाही. फाल्गुनीने गायलेल्या गाण्यांवर त्याने जबरदस्त डान्स केला. या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी फाल्गुनीही स्वत:ला रोखू शकली नाही आणि तिने हृतिक रोशनबरोबर वन टू वन डान्स स्टेप केला. हृतिक रोशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये तो फाल्गुनीसोबत पारंपरिक डान्स स्टेप्स करीत आहे. हृतिकने यावेळी त्याच्याच गाण्यावरची त्याची प्रसिद्ध स्टेप फाल्गुनीला शिकवली.

जाहिरात

पंडालमध्ये आल्यावर हृतिक रोशनने सर्वप्रथम माता राणीसमोर हात जोडले. यावेळी त्याचा सत्कार देखील करण्यात आला. यानंतर हृतिकनेही आपल्या स्टाईलने चाहत्यांची मने जिंकली. त्याने सर्वांना शुभेच्छा दिल्या. हृतिक रोशन एकटा डान्स करीत नव्हता तर फाल्गुनीनेही त्याच्यासोबत डान्स केला. चाहत्यांना हृतिक-फाल्गुनीचा डान्स आवडला.

News18लोकमत
News18लोकमत

एकीकडे फाल्गुनी गात आहे. दुसरीकडे हृतिक रोशन डान्स करीत आहे. हृतिकच्या डान्ससोबतच त्याच्या स्टाइलचेही सगळेच कौतुक करीत आहेत. विक्रम वेधा प्रदर्शित झाल्यानंतर हृतिकचा हा पहिलाच व्हिडिओ आहे. ज्यामध्ये तो सार्वजनिक ठिकाणी डान्स करत आहे. त्याच्या  ‘विक्रम वेधा’ तील भूमिकेसाठी त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आता त्याच्या डान्सने तो प्रेक्षकांचं मन जिंकत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात