आपल्या वैयक्तिक इन्स्टा हँडलवरून वनितानं हे फोटो शेअर केले आहेत. अतिशय ग्लॅमरस आणि बिनधास्त लुकमुळे काही वेळातच तिचं हे फोटोशूट व्हायरल झालं. हेही वाचा फेव्हरेट मराठी सेलिब्रिटी कपल कोरोनाच्या विळख्यात; सोशल मीडियावर केली पोस्ट या फोटोशूटसाठी तिनं केलेली वेशभूषा एकदमच हटके आहे. वनितानं प्रिंटेड डीप नेक जॅकेट, ब्लॅक पॅन्ट आणि गळ्यात एक लांब ठसठशीत चेन घातली आहे. आपल्या या फोटोजमध्ये ती अतिशय कॉन्फिडन्ट दिसते आहे.View this post on Instagram
पोस्टसोबत तिनं plus size model, bold and beautiful love yourself असे हॅशटॅग्जही दिले आहेत. या फोटोजवर संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. काहींनी तिचे हे फोटोज कमालीचे सुंदर आणि योग्य असल्याचं म्हटलं आहे तर काहींनी अशा प्रकारचे कपडे घालणं अयोग्य असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. हेही वाचा ‘मी त्यांची बँड वाजवायचो म्हणून माझ्यावर चिढतात’; गोविंदा बॉलिवूडवर संतापला 2021 च्या सुरुवातीलाच वनितानं न्यूड फोटोशूट केलं होतं. यामागची भूमिका मांडतांना तिनं लिहिलं होतं, की मला माझ्या प्रतिभेचा आणि कौशल्याचा अभिमान आहे. माझं शरीर जसं आहे तसा मला त्याचा अभिमान आहे. कारण मी, मी आहे!' यावरून सोशल मीडियावर मोठ वादळ उठलं होतं.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bold photoshoot, Instagram, Viral photo