Home /News /entertainment /

Indian Idol Marathi: नवोदित गायकांना झळकायची मोठी संधी ; सहभागी होण्यासाठी करा फक्त 'हे'

Indian Idol Marathi: नवोदित गायकांना झळकायची मोठी संधी ; सहभागी होण्यासाठी करा फक्त 'हे'

मराठी इंडियन आयडॉल लवकरच सुरू होणार आहे.

मराठी इंडियन आयडॉल लवकरच सुरू होणार आहे.

Bigg Boss Marathi 3 हा शो रविवारपासून मोठ्या धुमधडाक्यात सुरू झालाय. आता कर्लस मराठीनंतर सोनी मराठी वाहिनी Indian Idol हा शो मराठीत घेऊन येतेय. कसं सहभागी होता येईल यात?

    मुंबई 21 सप्टेंबर 2021: सध्या मनोरंजन क्षेत्रात रिअॅलिटी शोची चलती आहे असेच म्हणावे लागेल. कारण कर्लस मराठीवर नुकतात बिग बॉस मराठीचा तीसरा सीझनची ( Bigg Boss Marathi 3 ) रविवारपासून मोठ्या धुमधडाक्यात सुरूवात झाली आहे. आता कर्लस मराठीनंतर सोनी मराठी वाहिनी देखील एक रिअॅलिटी शो घेऊन येत आहे. इंडियन आयडल मराठी (Indian Idol Marathi) हा कार्यक्रम लवकरच सोनी मराठीवर (Sony liv app) प्रदर्शित होणार आहे. या कार्यक्रमता कसे सहभागी व्हायची, याच्या ऑडिशन्स कधीपासून सुरू होणार याची सगळी माहिती सोनी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टा अंकाऊटवर दिली आहे. सहभागी होण्यासाठी सोनी लिव्ह अ‍ॅप डाऊनलोड करा किंवा अपडेट करा सोनी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टा अंकाऊटवर एक व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. यामध्ये त्यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सोनी लिव्ह अॅप डाऊनलोड करा किंवा अपडेट करायची आहे. व घर बसल्या आपण याच्यावर आपली ऑडिओ क्लिप अपलोड करायाची आहे. ऑडिशन्स 17 सप्टेंबरपासून सुरू होत असल्याचे देखील माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे कुठे ही न जाता आता घरबसल्या या कार्यक्रमाची ऑडिशन देता येणार असल्याने प्रेक्षकांच्या मनात आनंदाचे वातावरण आहे. वाचा :  Bigg Boss marathi 3: Real मध्ये घटस्फोट, Reality Show साठी आता एकाच घरात राहणार हा व्हिडिओ शेअर करत सोनी मराठी वाहिनीने #इंडियनआयडलमराठी | #IndianIdolMarathi#, सोनीमराठी , #SonyMarathi, #विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati असे काही टॅग देखील दिले आहेत. हिंदी इंडियन आयडल प्रमाणे इंडियन आयडल मराठीला देखील प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतील. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशाल देखील नवीन गायक मिळतील. तसेच या कार्यक्रमाचे परिक्षक कोण असणार याची वेळ किती वाजता असणार याची माहिती समोर आलेली नाही.
    प्रेक्षकांना देखील हा कार्यक्रम पाहण्याची उत्सुकता लागली आहे.यंदा हिंदी इंडियन आयडलचा किताब पवनदीपने जिंकला आहे. पवनदीप उत्तम गायक आहेच त्याचप्रमाणे तो विविध वाद्य देखील वाजवतो. त्याच्या आवाजात एक वेगळी जादू आहे ज्यामुळे तो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या कार्यक्रमा दरम्यान त्याचे नाव स्पर्धक असलेली अरुंधती हिच्यासोबत जोडले गेले होते. मात्र दोघांनीही आमच्यात  फक्त मैत्रीचे नाते असल्याचे वारंवार सांगितले आहे.
    First published:

    Tags: Marathi entertainment, Sony tv

    पुढील बातम्या