हिंदी बोलणाऱ्या अँकरला ए. आर. रेहमान यांनी केलं ट्रोल; पाहा Video

हिंदी बोलणाऱ्या अँकरला ए. आर. रेहमान यांनी केलं ट्रोल; पाहा Video

प्रमोशनदरम्यान हिंदी बोलणाऱ्या एका अँकरला त्यांनी ट्रोल केलं. त्यांच्या या अनोख्या ट्रोलिंगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

  • Share this:

मुंबई 27 मार्च: ए. आर. रेहमान (A. R. Rahman) हे भारतातील सर्वोत्कृष्ट संगीतकारांपैकी एक म्हणून ओळखले जातात. ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरणारे रेहमान सध्या 99 या चित्रपटातील गाण्यांमुळं चर्चेत आहेत. 99 हा एक तमिळ चित्रपट आहे. स्वत: रेहमान यांनी या चित्रपटाच्या प्रमोशनची जबाबदारी स्विकारली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या प्रमोशनदरम्यान हिंदी बोलणाऱ्या एका अँकरला त्यांनी ट्रोल केलं. त्यांच्या या अनोख्या ट्रोलिंगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

नेमकं काय म्हणाले रेहमान?

ए. आर. रेहमान चेन्नईमध्ये चित्रपटातील कलाकारांसोबत प्रमोशन करत होते. त्यावेळी स्टेजवरील अँकरनं अभिनेता एहान भट्टचं हिंदीमध्ये स्वागत केलं. तिचं हिंदी ऐकून रेहमान यांनी भूवया उंचावल्या अन् हिंदीमध्ये बोलतेयस का? असा सवाल केला. अर्थात हा प्रश्न त्यांनी गंमतीनं विचारला होता. त्यानंतर अँकरनं मी केवळ त्याचं स्वागत करत होते अशी प्रतिक्रिया हसताना दिली. अर्थात हे सर्व संभाषण गंमत म्हणून सुरु होतं. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Surya (@suryasurya5073)

दक्षिण भारतात हिंदी भाषेचा वापर खूपच कमी प्रमाणात केला जातो. अगदी चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये देखील कलाकार हिंदी किंवा इंग्रजी ऐवजी त्यांच्या मातृभाषेत बोलतात. या पार्श्वभूमीवर एका तमिळ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अँकर हिंदी बोलतेय हे ऐकून रेहमान यांना आश्चर्य वाटलं अन् त्यांनी तिची खिल्ली उडवली.

Published by: Mandar Gurav
First published: March 27, 2021, 10:03 AM IST

ताज्या बातम्या