मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

जॉन-बिपाशाचे बोल्ड सीन कसे केले होते शूट? पूजा भट्टनं सांगितला जिस्ममधील अनुभव

जॉन-बिपाशाचे बोल्ड सीन कसे केले होते शूट? पूजा भट्टनं सांगितला जिस्ममधील अनुभव

या चित्रपटातील दृश्यांचं चित्रीकरण करणं वाटतं तितक सोपं नव्हतं. या शूटिंगदरम्यान आलेले अनुभव दिग्दर्शक पूजा भट्टनं (Pooja Bhatt) सांगितले.

या चित्रपटातील दृश्यांचं चित्रीकरण करणं वाटतं तितक सोपं नव्हतं. या शूटिंगदरम्यान आलेले अनुभव दिग्दर्शक पूजा भट्टनं (Pooja Bhatt) सांगितले.

या चित्रपटातील दृश्यांचं चित्रीकरण करणं वाटतं तितक सोपं नव्हतं. या शूटिंगदरम्यान आलेले अनुभव दिग्दर्शक पूजा भट्टनं (Pooja Bhatt) सांगितले.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 20 एप्रिल:  जिस्म (Jism) हा बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. 2003 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट काळाच्या पुढे होता असंही म्हणलं जातं. आज आपण चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये किसिंग सीन सर्रास पाहतो परंतु हा ट्रेंड खऱ्या अर्थानं सुरु केला तो जिस्म या चित्रपटानं. या चित्रपटानं बोल्ड विषय पाहणारा एक वेगळाच प्रेक्षक वर्ग भारतात निर्माण केला. परंतु या चित्रपटातील दृश्यांचं चित्रीकरण करणं वाटतं तितक सोपं नव्हतं. या शूटिंगदरम्यान आलेले अनुभव दिग्दर्शक पूजा भट्टनं (Pooja Bhatt) सांगितले.

जिस्म या चित्रपटात अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. हे दोन्ही कलाकार मॉडलिंग क्षेत्रातून बॉलिवूडमध्ये आले होते. तरी देखील किसिंग सीनसाठी त्यांना तयार करणं हे एक मोठं आव्हान होतं. पूजानं नुकतीच टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. त्यावेळी तिनं आपल्या करिअवर भाष्य करताना जिस्म चित्रपटाच्या वेळी आलेले अनुभव सांगितले.

ऋतुजा बागवेचा Topless अवतार; Bold फोटो पाहून मराठी कलाकारही झाले अवाक

ती म्हणाली, “चित्रपटांतील दृश्यांची मर्यादा काय असेल? हे ठरवण्याचा अधिकार मी दोन्ही कलाकारांना दिला होता. त्यांनी किती टॉपलेस व्हायचं हे दोघांनी चर्चा करुन ठरवा असं म्हटलं होतं. अर्थात टॉपलेस सीनसाठी त्यांचा आक्षेप नव्हता पण किस करण्यासाठी ते तयार नव्हते. सुरुवातीला मी त्यांची अट मान्य केली. अन् आम्ही काही खास क्रू मेंमरच्या उपस्थितीत हे सीन शूट करण्यास सुरुवात केली. जसजसं शूट पुढे गेलं तसतसं पटकथेच्या मागणीनुसार किसिंग सीन गरजेचे आहेत हे बिपाशाच्या देखील लक्षात येऊ लागलं. त्यामुळं तिनं या दृश्यांसाठी होकार दिला. हे सीन वल्गर दिसणार नाहीत याची काळजी आम्ही पुरेपुर घेत होतो. त्यामुळं जवळपास आठ दिवस आम्ही त्या सीनवर काम केलं. अर्थात आमच्या मेहनतीचं फळ आम्हाला अखेर मिळालं. चित्रपट सुपरहिट झाला अन् आम्ही बोल्ड विषय हाताळणारा एक नवा ट्रेंड सरु केला.”

अभिनेत्रीसोबत घडला अजब प्रकार; चाहता फोटो काढायला आला अन् किस करुन गेला

जिस्म या चित्रपटाचं दिग्दर्शन अमित सक्सेना यानं केलं होतं. एक महिला जी आपल्या आर्थिक महत्वाकांक्षा पुर्ण करण्यासाठी पुरुषांचा वापर करते. पुरुषांना आपल्या मादक शरीराचं आमिष दाखवून कशाप्रकारे त्यांचा गैरवापर करते हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. बिपाशाच्या जाळ्यात अडकलेला जॉन कशाप्रकारे तिला मात देतो या पटकथेभोवती हा चित्रपट फिरतो. त्याकाळी किसिंग सीनमुळं हा चित्रपटा तुफान गाजला होता.

First published:

Tags: Bipasha basu, Entertainment, John abraham, Pooja bhatt