अभिनेत्रीसोबत घडला अजब प्रकार; चाहता फोटो काढायला आला अन् किस करुन गेला

अभिनेत्रीसोबत घडला अजब प्रकार; चाहता फोटो काढायला आला अन् किस करुन गेला

या चाहत्यानं फोटो काढण्याच्या बाहाण्यानं सर्वांसमोर अर्शीला किस केलं. (Fan Kissed Arshi Khan on Airport) विमानतळावर घडलेल्या या अजब घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई 20 एप्रिल: बिग बॉस (Bigg Boss) या लोकप्रिय शोमुळं प्रसिद्ध झालेली अभिनेत्री अर्शी खान (Arshi Khan) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. यामुळं अनेकदा तिला ट्रोल देखील केलं जातं. मात्र यावेळी ती कुठल्याही विधानामुळं नव्हे तर तिच्या एका चाहत्यामुळं चर्चेत आहे. या चाहत्यानं फोटो काढण्याच्या बाहाण्यानं सर्वांसमोर अर्शीला किस केलं. (Fan Kissed Arshi Khan on Airport) विमानतळावर घडलेल्या या अजब घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अर्शी नुकतीच सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मालदीव येथे गेली. त्यावेळी विमानतळावर तिची भेट एका चाहत्याशी झाली. खरं तर कोणीही ओळखू नये म्हणून तिनं बुरखा घातला होता. परंतु त्याही स्थितीत एका चाहत्यानं दिला ओळखलंच. अखेर चाहत्याच्या आग्रहास्तव ती त्याच्यासोबत फोटो काढायला देखील तयार झाली. मात्र या चाहत्यानं फोटोचं निमित्त साधून सर्वांसमोर अर्शीला किस केलं. त्याची ही कृती पाहून अर्शी देखील काय बोलावं? या विचारानं गोंधळली. मात्र ही घटना तेथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी आपल्या कॅमेरात कैद केली. अन् हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा - मुंबई फिरायला आली अन् झाली अभिनेत्री; पाहा रतन राजपूतचा अजब प्रवास

बिग बॉसमध्ये कमाल केल्यानंतर आता ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. अर्शी का स्वयंवर हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या शोमध्ये ती एका तरुणाला निवडेल अन् त्याच्यासोबत लग्न करेल. अर्थात हे लग्न राखी सारखंच खोटं असेल की खरं हे पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत.

Published by: Mandar Gurav
First published: April 20, 2021, 10:33 AM IST

ताज्या बातम्या