मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बापरे! 18 मिनिटं मधमाश्यांना अंगावर घेऊन शूट पूर्ण केलं; अभिनेत्रीचा Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

बापरे! 18 मिनिटं मधमाश्यांना अंगावर घेऊन शूट पूर्ण केलं; अभिनेत्रीचा Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

अभिनेत्रीने चक्क मधमाश्यांसोबत फोटोशूट केलं आहे. तेही तब्बल 18 मिनिटं. त्यामुळे या फोटोशूटची चर्चा आता जगभरात होत आहे.

अभिनेत्रीने चक्क मधमाश्यांसोबत फोटोशूट केलं आहे. तेही तब्बल 18 मिनिटं. त्यामुळे या फोटोशूटची चर्चा आता जगभरात होत आहे.

अभिनेत्रीने चक्क मधमाश्यांसोबत फोटोशूट केलं आहे. तेही तब्बल 18 मिनिटं. त्यामुळे या फोटोशूटची चर्चा आता जगभरात होत आहे.

  • Published by:  News Digital

मुंबई 21 मे : मॉडेल्स आणि अभिनेत्रींना अवघड टास्क देत फोटोशूट करणं यात काही नवं नाही. पण एका मोठ्या अभिनेत्रीने चक्क मधमाश्यांसोबत फोटोशुट केलं आहे. तेही तब्बल 18 मिनिटं. त्यामुळे या फोटोशूटची चर्चा आता जगभरात होत आहे. हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली (Angelina Jolie) हिने हे अनोखं शूट केलं आहे.

जागतिक मधमाशी दिनाचं (world Honeybee day) औचित्य साधत नॅशनल ज्योग्राफिक (National geographic)  या मासिकासाठी तिने हे फोटोशूट केलं होत. तर प्रसिद्ध छायाचित्रकार डॅन विन्टर्स यांनी हे शुट केलं होतं. त्यामुळे या शुटची आता जगभरात चर्चा रंगली आहे. अँजेलिनाने अगदी संयमाने हे शूट पार पाडलं.

पॅलेस्टाइनच्या वादात माहिरा खानची उडी; म्हणाली 'आपण गप्प बसलो तर..'

या शूटसाठी अँजेलीनाच्या खांद्यावर तसंच डोक्यावर आणि चेहऱ्यावर देखील या मधमाशा सोडण्यात आल्या होत्या. अँजेलिनाला अगदी हालचाल न करता स्तब्ध उभं राहायचं होतं. तिच्या अंगावर या मधमाश्या 18 मीनिटांसाठी वावरत होत्या.

अँजेलीनाच हे अनोख फोटोशुट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर तिचं कौतुकही होत आहे. काहीच तासांत तिच्या या व्हिडिओला लाखोंनी व्हूज ही मिळाले आहेत. पण त्यासोबतच हे शुट करणही तितकच अवघड होतं. याविषयी बोलताना फोटोग्राफर डॅन विन्टर्स (Dan Winters) यांनी सांगितले की, “या शुट साठी खास इटालियन मधमाश्या वापरण्यात आल्या होत्या. तर सेट वर अँजेलीनाला बी सुट प्रोटेक्शन लावण्यात आलं होतं. तर त्यांनी स्वतः हे अँजेलीनाच्या मानेवर , खांद्यावर व चेहऱ्यावर ते लावलं होतं. जेणेकरून मधमाश्या सगळीकडे पसरतील व एकत्र झुंड करणार नाही. फेरोमेन या केमिकल कडे मधमाश्या आकर्षित होतात. त्यामुळे त्याचा उपयोग करण्यात आला होता.”

पुढे ते म्हणाले, “अँजेलीना अगदी स्तब्ध 18 मीनिटांसाठी उभी होती. मधमाश्यांसोबतचा हा अनुभव माझ्यासाठी कायमच लक्षात राहिल. मला असं वाटत की जागतिक मधमाशी दिनानिमित्त आम्ही फोटोग्राफी विश्वात स्वतःची मुळं रुजवली आहेत.”

First published:

Tags: Entertainment, Hollywood