जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Actors Strike: हॉलिवूड शटडाऊन! अभिनेता टॉम क्रूझ आणि अँजेलिना जोलीसह अनेक कलाकारांनी पुकारला संप; कारण काय?

Actors Strike: हॉलिवूड शटडाऊन! अभिनेता टॉम क्रूझ आणि अँजेलिना जोलीसह अनेक कलाकारांनी पुकारला संप; कारण काय?

बॉलिवूडमध्ये शटडाऊन

बॉलिवूडमध्ये शटडाऊन

कलाकारांच्या वॉकआउटमुळे युनायटेड स्टेट्समधील सर्व चित्रपट आणि स्क्रिप्टेड टेलिव्हिजन शोची निर्मिती थांबणार आहे. या संपामागचं नेमकं कारण जाणून घ्या.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 14 जुलै :   अमेरिकेतील चित्रपट उद्योग ‘हॉलिवूड’नावानं प्रसिद्ध आहे, याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. जगभरातील चित्रपट उद्योगाचा विचार केला तर हॉलिवूड सर्व बाबतीत सरस ठरतं. येथील चित्रपट भव्य-दिव्य असतात आणि कलाकारही कोट्यवधी रुपये मानधन मिळवतात. मात्र, हॉलिवूडचा कणा असलेले हे कलाकार सध्या संपावर गेले आहेत. तिथे 63 वर्षातील पहिलं मोठं शटडाउन सुरू झालं आहे. कमी मोबदला आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) उद्भवलेल्या धोक्यामुळे 11 आठवड्यांपूर्वी अनेक लेखकांनी नोकरी सोडली होती. आता हजारो चित्रपट आणि टेलिव्हिजन कलाकारांनी या लेखकांना पाठिंबा देऊन काम बंद केलं आहे. वॉल्ट डिस्ने कंपनी आणि नेटफ्लिक्स आयएनसी स्टुडिओचं प्रतिनिधित्व करणार्‍या अलायन्स ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्ससोबत नवीन कामगार करार करण्यात अयशस्वी झाल्यानंतर स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्डनं वॉकआउटची घोषणा केली आहे. स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड ही युनियन सुमारे 1 लाख 60 हजार कलाकारांचं प्रतिनिधित्व करते. मध्यरात्रीपासून कलाकार आणि लेखकांचा संप सुरू झाला आहे. 1960 पासून दोन्ही संघटना एकाच वेळी संपावर गेल्याची ही पहिलीच वेळ आहे. 1960 अभिनेता (अमेरिकेचे माजी राष्ट्रपती) रोनाल्ड रेगन यांच्या नेतृत्वाखील संप झाला होता. हेही वाचा -  Jawan आधी शाहरूखनं ‘या’ 5 सिनेमात केलाय डबल रोल; बॉक्स ऑफिसवर अशी होती त्या सिनेमांची अवस्था संपाचा परिणाम काय होणार? कलाकारांच्या वॉकआउटमुळे युनायटेड स्टेट्समधील सर्व चित्रपट आणि स्क्रिप्टेड टेलिव्हिजन शोची निर्मिती थांबणार आहे. युनियन्ससह कामगार करारामध्ये समाविष्ट नसलेली स्वतंत्र प्रॉडक्शन हाउस याला अपवाद असतील. ‘स्ट्रेंजर थिंग्ज’ आणि ‘अँड द हँडमेड्स टेल’सारख्या लोकप्रिय मालिकांच्या निर्मितीला आता बराच उशीर होईल. हा संप सुरू राहिल्यास काही प्रमुख चित्रपट देखील पुढे ढकलले जाऊ शकतात. या संपाचा चित्रपटांवर लगेच परिणाम होण्याची शक्यता नाही कारण चित्रपट तयार होण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागतात. पण, मार्व्हलच्या ‘ब्लेड’ आणि ‘थंडरबोल्ट्स’सारख्या भविष्यातील रिलीझना नक्कीच उशीर होईल. कामगार संघर्षांचे निराकरण होईपर्यंत या चित्रपटांची निर्मिती थांबवली जाण्याची शक्यता आहे. या शिवाय, आगामी चित्रपटांचे प्रमोशनल इव्हेंट्सही रद्द होण्याची शक्यता आहे. हेही वाचा - भाईजानचा शेरा ते दीपिकाचा जलाल; ‘हे’ बॉलीवूड सेलेब्स बॉडीगार्डला देतात इतका पगार स्ट्रिमिंग सर्व्हिसेसवर काय परिणाम होणार? नेटफ्लिक्स, अॅमेझॉन डॉट कॉम आयएनसीच्या प्राइम व्हिडिओ सारख्या स्ट्रीमिंग सर्व्हिसेस कोरिया आणि भारतासारख्या ठिकाणी बनवलेले स्थानिक-भाषेतील शो स्ट्रीम करू शकतात. पण, प्लॅटफॉर्मवरील हॉलिवूड निर्मिती थांबवली जाईल. यूएस करमणूक उद्योगातील 90 टक्के पेक्षा जास्त ग्राहक टीव्ही आणि डिजिटल सबस्क्रिप्शनवर पैसे खर्च करतात. म्हणजेच कलाकारांच्या संपाचा स्ट्रिमिंग सर्व्हिसेसवर जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    टॉम क्रूझ आणि अँजेलिना जोलीसह अनेक मोठे कलाकार संपात सहभागी स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड (एसएजी-एएफटीआरए) टॉम क्रूझ, अँजेलिना जोली आणि जॉनी डेपसारख्या ए-लिस्ट स्टार्ससह एकूण 1 लाख 60 हजार कलाकारांचं प्रतिनिधित्व करते. ते देखील या संपात सहभागी झाले आहेत. मेरिल स्ट्रीप, बेन स्टिलर आणि कॉलिन फॅरेल यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी जाहीरपणे संपाला पाठिंबा दिला आहे. “हे मोठे स्टार्स आर्थिक फायद्यासाठी संपात सहभागी झालेले नाहीत. कारण, त्याचे एजंट्स स्टुडिओंशी कलाकारांच्या वैयक्तिक कॉन्ट्रॅक्टबद्दल स्वतंत्र वाटाघाटी करत असतात. या कलाकारांना मिळणारी रक्कम ही कलाकार संघटनेने दिलेल्या रकमेपेक्षा खूप मोठी असते. पण, त्यांच्या उपस्थितीमुळे संपाला महत्त्व प्राप्त झालं असून योग्य वाटाघाटी करण्यासाठी स्टुडिओंवर दबाब येऊ शकतो,” असं अभिनेता डॉमिनिक बर्गेस म्हणाला.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात