मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अभिनेत्यानं केला कोट्यवधींचा घोटाळा; सापळा रचून FBI नं केली अटक

अभिनेत्यानं केला कोट्यवधींचा घोटाळा; सापळा रचून FBI नं केली अटक

झॅकनं या योजनेद्वारे अनेक गुंतवणूकदारांना शेकडो मिलियन डॉलर्सचा चुना लावला आहे. झॅकवरील हा आरोप सिद्ध झाल्यास त्याला 20 वर्षाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

झॅकनं या योजनेद्वारे अनेक गुंतवणूकदारांना शेकडो मिलियन डॉलर्सचा चुना लावला आहे. झॅकवरील हा आरोप सिद्ध झाल्यास त्याला 20 वर्षाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

झॅकनं या योजनेद्वारे अनेक गुंतवणूकदारांना शेकडो मिलियन डॉलर्सचा चुना लावला आहे. झॅकवरील हा आरोप सिद्ध झाल्यास त्याला 20 वर्षाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

  मुंबई 8 एप्रिल: अमेरिकन अभिनेता झॅक एव्हरी(Zach Avery) याला एफबीआयनं (FBI) अटक केली आहे. एका पॉन्झी अर्थात बनावट स्कीमचा (Ponzi Scheme)मास्टरमाईंड असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. झॅकनं आरामदायी,सुखासीन आयुष्य जगण्यासाठी या पॉन्झी स्कीमचा वापर करून पैसा मिळवल्याचं एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. झॅकनं या योजनेद्वारे अनेक गुंतवणूकदारांना शेकडो मिलियन डॉलर्सचा चुना लावला आहे. झॅकवरील हा आरोप सिद्ध झाल्यास त्याला 20 वर्षाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

  झॅक एव्हरी याचं खरं नाव जाचरी होर्वित्झ असून,2015 मध्ये त्यानं ही योजना सुरु केली. यात गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना त्यानं तब्बल 35 टक्क्यांहून अधिक परतावा देण्याचं अमिष दाखवलं होतं,असं सिक्युरिटी आणि एक्स्चेंज कमिशननं (SEC)स्पष्ट केलं आहे. आपली कंपनी कॅपिटल फिल्म वितरणाचे अधिकार खरेदी करेल आणि नेटफ्लिक्स(Netflix)आणि एचबीओ(HBO)यांना त्याचा परवाना देईल,असं त्यानं ग्राहकांना सांगितलं होतं. प्रत्यक्षात झॅकचे कंपनीशी कोणतेही व्यावसायिक संबंध नव्हते. झॅकनं चित्रपट वितरणाचे(Film Distribution)कोणतेही अधिकार खरेदी न करता कंपनीच्या नावाखाली बनावट व्यवहार केले. नवीन गुंतवणूकदारांकडून मिळालेला पैसा जुन्या गुंतवणूकदारांना देण्यासाठी वापरला असल्याचं सेंट्रल डिस्ट्रीक्ट फॉर कॅलिफोर्नियाच्या विभागानं एका निवदेनात म्हटलं आहे. तसंच गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यानं खोटे कागदपत्रदेखील सादर केले. बनावट परवाना करार तसंच नेटफ्लिक्स आणि एचबीओ यांच्याशी झालेल्या बनावट वितरण कराराचे कागदपत्रही त्यानं गुंतवणूकदारांना दाखवले. या सगळ्या कागदपत्रांवर खोट्या सह्यादेखील केलेल्या होत्या,असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

  अवश्य पाहा - ‘अक्षय कुमार मला गुप्तपणे फोन करतो’; कंगना रणौतनं केला चकित करणारा दावा

  34वर्षीय झॅक एव्हरी यानं 2020 मध्ये ‘लास्ट मोमेंट ऑफ क्लेरिटी’ या चित्रपटात काम केलं होतं;पण त्याच्या या चित्रपटावर समीक्षकांनी बंदी घातली होती. त्याची चित्रपट सृष्टीतील कारकीर्द काही फार चांगली चालली नव्हती. अखेर अभिनेता म्हणून अपयशी ठरल्यावर आरामदायी आयुष्य जगण्यासाठी त्यानं पैसा कमावण्याकरता या बनावट योजनेचा आधार घेतला,असं सिक्युरिटी आणि एक्स्चेंज कमिशननं (SEC)म्हटलं आहे. हॉलीवूडमधील अभिनेता असल्याच्या वलयाचा उपयोग करून त्यानं अनेकांना या खोट्या योजनेच्या जाळ्यात अडकवलं. अनेकांकडून लाखो रुपये उकळले;मात्र अखेर त्याचं हे बिंग उघडकीस आलं आणि त्याच्या बोगस योजनेचा फुगा फुटला. झटपट पैसा कमावण्यासाठी झॅक एव्हरीयानं स्वीकारलेला चुकीचा मार्ग त्याला तुरुंगात घेऊन जाणारा ठरला आहे.

  First published:
  top videos

   Tags: Crime, Entertainment, Financial crime, Financial fraud