मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Sai Tamhankar: सई ताम्हणकरच्या बॉयफ्रेंडला पाहिलंय का? होळीनिमित्त गर्लफ्रेंडसाठी केली खास पोस्ट

Sai Tamhankar: सई ताम्हणकरच्या बॉयफ्रेंडला पाहिलंय का? होळीनिमित्त गर्लफ्रेंडसाठी केली खास पोस्ट

 सई ताम्हणकर

सई ताम्हणकर

Sai Tamhankar Holi 2023: नुकतंच सईच्या बॉयफ्रेंडने सईचा फोटो शेअर करत सुंदर असं कॅप्शनही दिलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई,8 मार्च-  मराठीतील बोल्ड-बिनधास्त अभिनेत्री सई ताम्हणकरला आता कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाहीय. अभिनेत्रीने सतत विविध धाटणीच्या भूमिका साकारत नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. सईला आपल्या मस्तमौला अंदाजासाठी ओळखलं जातं. अभिनेत्रीच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच तिच्या खाजगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठीही चाहते प्रचंड उत्सुक असतात. नुकतंच सईच्या बॉयफ्रेंडने सईचा फोटो शेअर करत सुंदर असं कॅप्शनही दिलं आहे. पाहूया अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने नेमकं काय म्हटलंय.

सई ताम्हणकर नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावत असते. सई ताम्हणकरने मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही आपला वेगळा ठसा उमठवला आहे. दोन वर्षांपूर्वी सई क्रिती सेननच्या 'मिमी' चित्रपटात झळकली होती. यामध्ये सईने क्रितीच्या खास मैत्रिणीची भूमिका साकारली होती. चित्रपटात सईने साकारलेल्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं. विशेष म्हणजे सई ताम्हणकरला या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

(हे वाचा:Aai Kuthe Kay Karte: लग्न मधेच सोडून पळाली अरुंधती? भर मंडपातून गायब झाली आई )

दरम्यान सई ताम्हणकर आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सई ताम्हणकरच्या लव्ह लाईफबाबत चाहत्यांना नेहमीच कुतूहल असतं. अभिनेत्री फारच कमीवेळा सोशल मीडियावर आपल्या लव्हलाईफबाबत बोलत असते.

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

अशातच आता सई ताम्हणकरचा बॉयफ्रेंड अनिश जोगने होळीनिमित्त एक फोटो शेअर केला आहे. अनिशने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केलेल्या या फोटोमध्ये सई ताम्हणकर दिसून येत आहे.

अनिशने शेअर केलेल्या फोटोवरुन सई विदेशात असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये सई सुपर स्टायलिश दिसून येत आहे. अनिश जोगने सईचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलंय, 'माझ्या होळीतील रंग'. सईसाठी रोमॅंटिक पोस्ट शेअर करत अनिश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सई ताम्हणकर निर्माता अनिश जोगला डेट करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सई आणि अनिश रिलेशनशिपमध्ये आहेत.सुरुवातीला या दोघांनीही आपलं नातं गुपित ठेवलं होतं. मात्र गेल्या काही काळापूर्वी या दोघांनी सोशल मीडियावर आपला एकत्र फोटो टाकत आपलं नातं उघड केलं होतं. त्यांनतर सतत हे दोघे एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात. चाहते सई आणि अनिशच्या फोटोंना छान प्रतिसाद देत असतात. दरम्यान या दोघांना लग्नबंधनात अडकलेलं पाहण्यासाठीही अनेकजण उत्सुक आहेत.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Holi 2023, Marathi actress, Marathi entertainment, Sai tamhankar