'आई कुठे काय करते' मालिकेत सध्या अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाचा सोहळा सुरु आहे. या दोघांच्या लग्नाचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान या मालिकेचा नवा प्रोमो आता समोर आला आहे. या प्रोमोने सर्वांनाच चकित केलं आहे. या प्रोमोमध्ये पंडित लग्नाच्या विधी उरकण्यासाठी नवरी मुलीला मंडपात बोलावत आहेत. मात्र ईशा धावत मंडपात येत सांगते की, आई आपल्या खोलीत नाहीय. आणि घरात कुठेच नाहीय. यामुळे सर्वच चिंतेत पडतात. आशुतोष अरुंधतीला शोधण्यासाठी उठतो. अरुंधती नेमकी कुठे गेली? किंवा तिच्यासोबत काही घडलं तरी नसेल ना? अशी शंका सर्वांच्या मनात येते. दरम्यान ती लग्न सोडून पळून गेली असेल असं अनिरुद्ध म्हणतो. त्यामुळे मालिकेत पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.