Home /News /entertainment /

हिना खानचं संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह; चेहऱ्याची अवस्था पाहून चाहत्यांना बसला धक्का

हिना खानचं संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह; चेहऱ्याची अवस्था पाहून चाहत्यांना बसला धक्का

हिना खानच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून तिनं ही माहिती दिली आहे. शिवाय तिचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

  मुंबई, 9 जानेवरी- देशासह राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. बॉलिवूडला देखील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा चांगलाच फटका बसला आहे. या नवीन वर्षात बॉलवूडसह टीव्ही जगतातील अनेक सेलेब्स त्यांच्या घरच्या सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता या यादीत टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान (Hina Khan) हिच्या नावाची भर पडली आहे. हिना खानच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. हिना खानचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, ही एक चांगली गोष्ट आहे. सध्या ती घरच्या मंडळींची काळजी घेत आहे. तिनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत दु: ख व्यक्त केलं आहे. हिना खानने इन्स्टावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोंमध्ये तिच्या तोंडाल मास्क दिसत नाही. मात्र तिच्या चेहऱ्यावर मास्क घालून लाल डाग उठले आहेत. सध्या हिना तिच्या घरच्यांची काळजी घेत आहे. आजचे एक कठोर सत्य हे आहे की, आयुष्य आणि इन्स्टावरचे फोटो सर्व चांगले व्हिज्युअल आहेत. हे 2022 आहे त्यामुळे हे वर्ष 2020 पेक्षा जास्त कठिण वाटते. जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्यांना कोरोनाचा संसर्ग होतो आणि तुमचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येतो. तेव्हा तुम्हाला मास्क आणि सॅनिटायझरसह 24 तास 7 दिवस तयार असावं लागते. कुटुंबाची काळजी घ्यावी लागते. यामुळे काही खुणा, डाग, वर्ण दिसतात...जसं सध्या माझ्या चेहऱ्यावर मास्क घातल्याने दिसत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by HK (@realhinakhan)

  हिना पुढे म्हणते की, जेव्हा आयुष्यात असे अडथळे येतात तेव्हा योद्धा व्हायला हवं किंवा प्रयत्न तरी करायला पाहिजेत. ही पोस्ट त्यासाठीच आहे. प्रयत्न करणेच खूप आहे. आता आपण सर्वांनी पुन्हा लढण्याचा प्रयत्न करूया. या डागासारखाच हा काळ देखील निघून जाईल. हिनाचा फोटो पाहून चाहत्यांना मात्र चांगलाच धक्का बसला आहे. वाचा-ईशा गुप्ताला कोरोनाची लागण ; इन्स्टा पोस्ट करत दिली माहिती मागच्या वर्षात हिना खानने एप्रिल महिना इन्स्टा पोस्ट करत तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. तिनं पोस्टमध्ये म्हटलं होते की, “माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी या अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक काळात माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनानंतर मी स्वत:ला घरी क्वारंटाइन केले आहे आणि आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood News, Coronavirus, Entertainment, Hina khan

  पुढील बातम्या