मुंबई, 12 सप्टेंबर : रानू मंडल हे नाव आता सर्वपरिचित आहे. त्यांच्या जादुई आवाजानं सर्वांनाच वेड लावलं. आज रानू यांना ओळखत नाही असं आता क्वचितच कोणीतरी सापडेल. नुकतंच रानू यांचं पहिलं गाणं ‘तेरी मेरी कहानी’ रिलीज झालं. रेल्वे स्टेशनवर गाणाऱ्या रानूचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हिमेश रेशमियानं तिला त्याच्या सिनेमासाठी गाण्याची संधी दिली होती. मागच्या काही दिवसांपीसून हिमेशच्या स्टुडिओमधील रानू यांचा ‘तेरी मेरी काहानी’ या गाण्याचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला होता. त्यानंतर सर्वांनाच रानू यांच्या पहिल्या गाण्याच्या रिलीजची उत्सुकता होती. या गाण्याचा टीजर हिमेशनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. दरम्यान रानू यांच्या आवाजाची तुलना लता मंगेशकर यांच्या आवाजाशी केली जाऊ लागली. त्यानंतर लता मंगेशकर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. नव्वदीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या लता मंगेशकर म्हणाल्या, “माझ्या नावाने आणि मी गायलेल्या गाण्यांनी कुणाचं भलं होत असेल तर मला आनंदच आहे. पण गायकी ओरिजिनल नसेल तर यश अल्पजीवी असतं.” कुठलीही आणि कुणाचीही नक्कल ही जास्त काळ टिकणारी नसते. म्हणून स्वतःचं वैशिष्ट्य शोधावं, अशी प्रतिक्रिया लता दिदींनी दिली होती. त्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात येत होतं. पण आता लता दीदींच्या या वक्तव्यावर हिमेशनं आपली प्रतिक्रिया दिली आहे. लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला अनवाणी पोहोचली दीपिका पदुकोण
हिमेश म्हणला, लता दीदींची प्रतिक्रिया लोकांनी चुकीच्या पद्धतीनं घेतली. एका कलाकारासाठी हे खूप गरजेच असतं की त्यानं कोणाचीतरी प्रेरणा घ्यावी आणि पुढे जावं. तुम्ही हे पाहामं गरजेच आहे की लता दीदींनी कोणत्या दृष्टीकोणातून ही कमेंट केली आहे. कोणत्याही सिंगरची नक्कल करण कधीच कामी येत नाही. मात्र माझ्या मते प्रेरणा घेणं खूपच गरजेच आहे. माझ्यावरही झाली होती टीका हिमेश म्हणला, कुमार शानू सांगतात, त्यांनी किशोर कुमार यांच्याकडून प्रेरणा घेतली. आपण सर्वचजण कोणाकोणाकडून प्रेरित होत असतो. जेव्हा मी गाणं गायला सुरुवात केली त्यावेळी लोकांनी माझ्यावरही टीका केली. मी नाकातून गातो असं अनेकांचं म्हणणं होतं. पण आता तुम्ही सुद्धा पाहू शकता की हेच आता इंटरनॅशनल ट्रेंड बनलं आहे. रानूंनी कॉपी केलं नाही हिमेश म्हणाला, मी मानतो की, रानू यांना हे टॅलेंट जन्मताच मिळालं आहे. त्यांनी लताजींकडून प्रेरणा नक्कीच घेतली आहे. मात्र मला नाही वाटत की लताजींसारखं महान गायक कोणी होऊ शकेल. त्या बेस्ट आहेत. रानू यांनी आत्ताच त्यांचं करिअर सुरू केलं आहे. मला वाटतं लोकांनी लता दीदींना चुकीचं समजलं आहे. त्यांनी रानू यांना सल्ला दिला आहे की, प्रेरणा घेणं चांगली गोष्ट आहे मात्र कोणाचीही कॉपी करु नये आणि रानू यांना कोणाचा आवाज कॉपी केलेला नाही.
‘एक प्यार का नगमा है’ गाण्यामुळे मिळाली प्रसिद्धी रानू रेल्वे स्टेशनवर गात असतानाच एतींद्र चक्रवर्ती अनेकदा रानू यांचं गाणं ऐकत असे आणि तिथून जात असे. एक दिवस त्यानं रानू यांचं प्यार का नगमा व्हिडीओ शूट केलं आणि हा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर अकाउटवर अपलोड केला. त्यानंतर सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या कंटेंटच्या शोधात असणाऱ्या अनेक पेज पैकी एक पेज ‘बरपेटा टाउन द प्लेस ऑफ पीस’ला यतींद्रचा हा व्हिडीओ सापडला. त्यानी ते त्यांच्या पेजवर शेअर केला. अशा रितीनं हा व्हिडीओ लाखो लोकांपर्यंत पोहोचला. त्यानंतर अनेक वेब पोर्टल्सनी त्याची बातमी केली आणि रानूच्या आवाजाची तुलना लता मंगेशकर यांच्यांशी केली जाऊ लागली. तनुश्री दत्ताच्या निशाण्यावर आता बॉलिवूडमधला ‘हा’ मोठा हिरो, म्हणाली… रानू यांचे व्हिडीओ सतत शेअर होत असल्यानं सोशल मीडिया पेज चालवणाऱ्या अनेकांनी एतींद्र पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे रानूच्या गाण्याला रिअलिटी शोमध्ये संधी मिळावी. याशिवाय रिअलिटी शो मेकर्स सुद्धा त्यांच्या टीआरपीसाठी असा प्रकारच्या गोष्टी शोधत असतात आणि योगायोगानं दोन्ही गोष्टी जुळून आल्या बॉलिवूडमध्ये हिट गाणी दिलेल्या हिमेश रेशमियानं रानू यांना पहिला ब्रेक दिला आणि त्यांचं आयुष्य बदललं. रानू मंडल यांचं पहिलं गाणं लाँच, भर कार्यक्रमात हिमेश रेशमियाला कोसळलं रडू ========================================================= VIDEO: आता शत्रूची काय बिशाद! भारतीय लष्कराचा ताफा आणखी मजबूत होणार