चाहत्यांसाठी सुरेल भेट; लतादीदी-किशोरदांचं अनपब्लिश गाणं हिमेश रेशमिया करणार रिलिज

चाहत्यांसाठी सुरेल भेट; लतादीदी-किशोरदांचं अनपब्लिश गाणं हिमेश रेशमिया करणार रिलिज

लतादीदी-किशोरदांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाबमी; हिमेश रेशमिया करणार त्यांची अनपब्लिश गाणी रिलिज

  • Share this:

मुंबई 6 मे: लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आणि किशोर कुमार (Kishore Kumar) हे भारतीय संगीतसृष्टीतील सर्वोत्कृष्ट गायकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. या दोन्ही कलाकारांनी विविध भाषांमध्ये आजवर हजारो गाणी गायली आहे. परंतु त्यांची अशीही काही गाणी आहेत जी काही कारणात्सव प्रदर्शित होऊ शकली नाही. परंतु हा अनपब्लिश खजिना संगीतकार हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) आता रसिकांसाठी खुला करणार आहे. इंडियन आयडल (Indian Idol -12) या शोमध्ये त्यानं ही मोठी घोषणा केली. त्याची ही घोषणा ऐकून चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

पाहा हिमेशने सांगितलेला हा भन्नाट किस्सा..

हिमेशचे वडील विपिन रेशमिया हे देखील बॉलिवूडमधील एक नामांकित संगीतकार म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आपल्या उमेदीच्या काळात लतादीदी आणि किशोदांसोबत एक गाणं रेकॉर्ड केलं होतं. या गाण्यात लतादीदींनी काही भन्नाट हरकती घेतल्या होत्या. मात्र किशोरदांना त्या तोडीचं गाणं गायला जमत नव्हतं. त्यामुळं विपिन यांनी त्यांच्यासाठी काही स्ट्रेट नोट्स तयार केल्या. पण किशोरदांनी मात्र हार मानली नाही. त्यांनी जणू निश्चयच केला होता अगदी लतादीदींच्या शैलीतच ते गाणं रेकॉर्ड करतील. पण त्यांनी त्यासाठी जवळपास सहा महिन्यांचा वेळ मागून घेतला. अर्थात किशोरदा सुपरस्टार होते त्यामुळं त्यांना नकार देण्याची शक्यता नव्हतीच. लक्षवेधी बाब म्हणजे किशोर कुमार यांनी आपली कमिटमेंट पाळली अन् सहा महिन्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा ते गाणं अगदी लतादीदींच्या शैलीतच रेकॉर्ड केलं. हे गाणं काही कारणात्सव कधी पब्लिश होऊ शकलं नाही. अन् पुढे काळाच्या ओघात नाहीसं झालं.

मराठी मालिकांना कोरोनाचा फटका; महाराष्ट्रानंतर गोव्यातही शूटिंगला बंदी

परंतु हा दुर्मिळ खजिना हिमेश रेशमिया यानं शोधून काढला आहे. त्याला ते गाणं सापडलं असून लवकरच तो सर्व रसिकांसाठी उपलब्ध करणार आहे. ही मोठी घोषणा त्यानं इंडियन आयडलच्या मंच्यावर सांगितली. अन् त्यावेळीच हा वरील किस्सा सांगितला. या किस्स्याचा व्हिडीओ देखील सोनी वाहिनीनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Published by: Mandar Gurav
First published: May 6, 2021, 4:06 PM IST

ताज्या बातम्या