मुंबई, 3 सप्टेंबर : मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi kavi) सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. हेमांगी नेहमीच तिचं परखड मत सोशल मीडियावर व्यक्त करत असते. कोणतंही क्षेत्र असो ती तिचं मत मांडताना दिसते. अनेकवेळा तिला तिच्या बेधडकपणामुळे कौतुकाची थापही मिळते तर कधी ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. त्यामुळे हेमांगी नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. अशातच हेमांगी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी हेमांगीची एक कमेंट सोशल माीडियावर अनेकांचं लक्ष वेधत आहे. हेमांगीच्या पोस्टवर एका चाहतीनं कमेंट केली होती. मात्र यावेळी हेमांगीनं कमेंट करणाऱ्या महिलेला चांगलंच सुनावल्याचं पहायला मिळालं. हेमांगीच्या पोस्टवर एका महिलेनं ‘हेमू तू आई कधी होणार’, अशी कमेंट केली होती. यावर हेमांगीनं अतिशय स्पष्टच उत्तर दिल्याचं दिसून आलं. कमेंटवर प्रतिक्रिया देताना हेमांगीनं म्हटलं की. ‘तुम्हाला नाही वाटत हा खूप पर्सनल प्रश्न आहे. आणि तो हा असा तुमच्यासारख्या शिकलेल्या व्यक्तीने येणं चुकीचं आहे. मी तुमची ही कमेंट इगनोर करु शकते. पण मला तुम्हाला आणि आपल्या सारख्या लोकांना कळवायचंय की, तू लग्न कधी करणार, तुमचा घटस्फोट झालाय का?, तू आई कधी होणार, तुम्हाला किती मुलं आहेत, तुमचा पगार किती आहे, हे असले पर्सनल प्रश्न कधी कुणालाही विचारु नये’. धन्यवाद!
हेमांगीची ही कमेंट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणार व्हायरल होत आहे. या कमेंटनं अनेकांचं लक्ष वेधलं असून यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. हेमांगीची पहिलीच पोस्ट किंवा पहिलीच कमेंट नाहीये की जी सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष केंद्रित करत आहे. यापहिलेही हेमांगीच्या अनेक पोस्ट कमेंट व्हायरल झालेल्या पहायला मिळाल्या. हेही वाचा - Maharashtra Shahir : केदार शिंदेंच्या लेकीचं ‘महाराष्ट्र शाहीर’मधून सिनेसृष्टीत पदार्पण; समोर आला फर्स्ट लुक दरम्यान, बोल्ड, बिनधास्त, ब्युटिफुल अशी ओळख असलेली हेमांगी सतत निरनिराळ्या गोष्टींमुळे चर्चेत असते अभिनयासोबतच विविध सामाजिक विषयांवर भाष्य केल्याने ती नेहमी चर्चेत असते. हेमांगीचा चाहतावर्गही बराच मोठा आहे. तिनं आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.