त्यावेळी प्रेमा म्हणाल्या की, ‘मी पडले म्हणून दे दणादण हा चित्रपट हिट झाला’ याचा किस्सा सांगितला. माझा सिनेमा दे दणादण तुम्हाला माहीतच असेल. तो एक गोल्डन जुबली सिनेमा. पुढे चित्रपटाविषयी सांगताना त्यातील गाण्यांची आठवण करुन देत त्यांनी ‘पोलीस वाल्या सायकल वाल्या’ या गाण्याचे थोडे बोलही गाऊन दाखवले. या गाण्याच्या शूटिंगवेळी महेश कोठारे यांनी आम्हाला दुपारच्या आत हे गाणं संपवायचं अशी ताकीद दिली होती. वाचा-ओमिक्रॉनचा धसका! 'आई कुठे काय करते'च्या सेटवरील हा फोटो सांगतोय सत्य त्यानंतर शूटिंग सुरू असताना लक्ष्मीकांत बेर्डे यांना सायकल नीट चालवता येत नव्हती. आणि अवघी दोन पावले पुढे जाऊ एवढं पुढे गेल्यावर त्यांनी प्रेमा यांना खाली पाडलं. असं... प्रेमा या सायकलीवरून चक्क तीन वेळा पडल्या होत्या. याबद्दल देखील त्यांनी सांगितलं. मी तीनवेळा पडले म्हणून सिनेमा हिट झाला असं म्हणताच सर्वजण हासू लागतात. त्यांचा हा किस्सा सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय झाला आहे.मी पडले पण पिक्चर हिट झाला. शुक्र - शनि, रात्री ९:३० वा. #HeTarKahichNay #ZeeMarathi आता तुमचे आवडते कार्यक्रम कधीही कुठेही पाहण्यासाठी https://t.co/9q8IXxXD38 या लिंकवर क्लिक करा. pic.twitter.com/eJIGVpxfzK
— Zee Marathi (@zeemarathi) January 6, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial