मुंबई, 4 फेब्रुवारी- झी मराठीवरील हे तर काही नाय (HeTar Kahich Nay ) या लोकप्रिय कॉमेडी शोमध्ये आतापर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावले आहेत. एकपेक्षा एक किस्से देखील आपण या कलाकारांच्या तोंडून ऐकले आहेत. या शोमध्ये मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी (Sushma Shiromani) यांनी हजेरी लावली आहे. याचा प्रोमो व्हिडिओ नुकताच झी मराठीने शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी भारत बंद आणि कुठं कुठं जायाचं हनिमूनला या गाण्याचं नेमकं काय कनेक्शन आहे याचा किस्सा सांगितला आहे. शिवाय त्यांनी शाहरूख खानने (Shahrukh Khan ) त्यांचे कसे लाड पुरवले हे देखील सांगितले आहे. सुषमा शिरोमणी यांच्या फटाकडी सिनेमात रेखा यांनी कुठं कुठं जायाचं हनिमूनला… हे आयटम साँग केले होते. या गाण्याचा किस्सा त्यांनी हे तर काहीच नायच्या मंचावर सांगितला. त्या म्हणाल्या क्या एक मोठी घटना घडली होती आणि भारत बंद होणार होता. त्याच्यादिवशी या गाण्याच्या शुटिंग होते. मग मी हे रेखाला सांगितले व ती म्हणाली काही काळजी करू नकोस. आपण रात्रीच स्टुडिओत जाऊन बसू. आम्ही तसंच केलं आणि दुसऱ्यादिवशी गाण्याचं चित्रीकरण झालं.. तर यानंतर त्यांनी एक शाहरूख खानचा किस्सा सांगितला. वाचा- माधुरी वाढवणार OTT ची धकधक, कधी होणार तिची पहिली सिरीज रिलीज? सुषमा शिरोमणी म्हणाल्या की, |ऑस्कर पुरस्कार आले त्यावेळी मी त्याची चेअरपर्सन होती. त्यावेळी शाहरूख खानच अशोका आणि अमिर खानचा लगान हे दोन सिनेमे चांगलेच चर्चेत होते. त्यावेळी माझे लहानपणापासून कोणी जेवढे लाड पुरवले नसतील तेवढे चेअरपर्सन झाल्यावर पुरवल्याचे त्यांनी सांगितले. हे लाड दुसऱ्या कुणी नाही तर शाहरूख खान तसेच जुही चावला यांनी पुरवल्याचे सांगितले. मला जरा काही झाले की, तरी शाहरूख खान माझी काळजी घ्यायचा व लाड पुरवायचा. त्याची इच्छा होती की, मी त्याचा सिनेमा ऑस्करसाठी पास करावा.मात्र मी प्रामाणिक होते, मी आमिर खानच्या लगान सिनेमाला ऑस्कर पाटवण्याचा निर्णय घेतला. त्या पुढे असं देखील म्हणाल्या की, यानंतर कोणी मात्र माझे लाड करायला आले नाही.
1980 साली फटाकडी हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात अशोक सराफ, उषा किरण, सुषमा शिरोमणी, रमेश देव, य़शवंत दत्त, विजू खोटे, निळू फुले, श्रीराम लागू या कलाकारांनी मुख्य भूमिका साकरल्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन दत्ता केशव यांनी केले आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिका म्हणजे फटाकडीची भूमिका अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांनी साकारली होती. या चित्रपटाचे लेखनदेखील सुषमा शिरोमणी यांनीच केले होते.