बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने नेटफ्लिक्सच्या 'द फेम गेम' सिरीजमधून डिजिटल डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे. ही सिरीज 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
'द फेम गेम' सिरीजमध्ये माधुरी अनामिका आनंदची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिरीजची कथा अनामिकाच्या भोवती फिरताना दिसणार आहे.
'द फेम गेम'मध्ये संजय कपूर, मानव कौल, लक्षवीर सरन आणि सुहासिनी मुळे, मुस्कान जाफरी यांच्याही भूमिका आहेत.
यापूर्वी या सिरीजचे नाव फाइंडिंग अनामिका असं होते. मात्र आता याचे नाव बदलून 'द फेम गेम' करण्यात आले आहे.
माधुरी दीक्षित मागच्या काही दिवसापासून कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. ती शेवटची करण जोहरच्या कलंक या चित्रपटात दिसली होती.
करण जोहरने शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. (फोटो साभार- Karan Johar instagram )