जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Rinku Rajguru च्या भावाला पाहिलंत का?; राखीच्या दिवशी शेअर केला खास PHOTO

Rinku Rajguru च्या भावाला पाहिलंत का?; राखीच्या दिवशी शेअर केला खास PHOTO

Rinku Rajguru

Rinku Rajguru

रिंकू राजगुरुनं आज रक्षाबंधनाच्या खास मुहुर्तावर आपल्या भावासोबतचा फोटो शेअर केला आहे. तुम्ही रिंकूच्या भावाला पाहिलंत का?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 ऑगस्ट : ‘सैराट’ चित्रपटामुळे घराघरात पोहचलेली आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru). रिंकूला तिच्या बिनधास्त अभिनय कौशल्यामुळे प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. रिंकू पहिल्याच चित्रपटात हिट झाली. सैराटनंतर तिला अनेक सिनेमांची ऑफर मिळत आहे आणि तिची लोकप्रियताही वाढत आहे. रिंकू कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते. रिंकूनं आज रक्षाबंधनाच्या खास मुहुर्तावर आपल्या भावासोबतचा फोटो शेअर केला आहे. रक्षाबंधनाच्या सणाबाबत भावा-बहिणींमध्ये प्रचंड उत्साह असतो. हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. आजच्या राखीपौर्णिमेच्या मुहुर्तावर रिंकूनंही तिच्या भावासोबत हा खास सण साजरा केला आहे. या खास सणाचे खास फोटोही रिंकूनं शेअर केलाय. या फोटोमध्ये रिंकू तिच्या भावाला ओवाळताना दिसत आहे.

जाहिरात

सध्या कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर सर्वत्र रक्षाबंधनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. यासाठी बाजारपेठा देखील मोठ्या प्रमाणावर सजल्या आहेत. बाजारात रंगेबिरंगी राख्या देखील आता आपल्याला उपलब्ध झाल्या आहेत. राखीपौर्णिमेच्या दिवशी बहिणी आपल्या लाडक्या भावाच्या हातावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. हेही वाचा -    ‘अब पैसा कौन देगा रे’; चक्क प्रिया बापटला पडली मदतीची गरज,असं काय घडलं? दरम्यान, रिंकू सध्या मराठी, हिंदी चित्रपट आणि वेबसीरिजमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अभिनेत्री विविध धाटणीच्या भूमिका साकारत रिंकू प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू आपल्या स्पष्ट आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. ती नेहमीच प्रत्येक प्रश्नाचं आपल्या हटके स्टाईलमध्ये उत्तर देत असते. अलीकडच्या काही वर्षांत रिंकूमध्ये झालेल्या ट्रान्सफॉर्मेशनने सर्वच थक्क झाले आहेत. सैराटमधील रिंकू आणि आताची रिंकू दोघींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात