हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील 10 वर्षीय कनिका शर्माने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. पानिपतच्या कनिकाने दोन बॉलिवूड चित्रपट साइन केले आहेत. टिकटॉकवर तिची प्रतिभा दाखवून कनिकाने बॉलिवूडच्या आकाशात भरारी घेतली आहे.
कनिकाने 'दादा जी की लाठी' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. आता ती बॉलिवूड कलाकार गोविंदा आणि रवीना टंडनसोबत 'टॉर्चर' चित्रपटात काम करणार आहे. टिकटॉकवरून व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर कनिकाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली आहे.
आता कनिकाला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. मुलीच्या यशाबद्दल पालकांनी आनंद व्यक्त केला आहे. कनिका ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. कनिका बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरला आपला आदर्श मानते. कनिकाचं मोठी स्टार बनण्याचं स्वप्न आहे.
कनिकाचे वडील सतीश कौशिक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. कनिका त्यांची एकुलती एक मुलगी. त्याला आपल्या मुलीला एमबीबीएस डॉक्टर बनवायचं होतं. परंतु, 2019 मध्ये टिक टॉक आणि मुलीची अभिनयाची आवड तिला बॉलिवूडमध्ये घेऊन गेली.
तिने सांगितलं की, ती फक्त 8 वर्षांची होती तेव्हापासून ती टिक टॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ बनवायची आणि पोस्ट करायची.