मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'#घरापासून-दूर'चा ट्रेंड नेमका काय? मराठमोळ्या ललित प्रभाकरने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राईज

'#घरापासून-दूर'चा ट्रेंड नेमका काय? मराठमोळ्या ललित प्रभाकरने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राईज

ललित प्रभाकर

ललित प्रभाकर

मागील काही दिवसांपासून बऱ्याच कलाकारांच्या सोशल मीडियावर #घरापासून_दूर चा जोरदार ट्रेंड दिसत आहे. यात हेमंत ढोमे, ललित प्रभाकर, क्षिती जोग, चिन्मय मांडलेकर अशा काही कलाकारांचा समावेश आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 29 सप्टेंबर-   मागील काही दिवसांपासून बऱ्याच कलाकारांच्या सोशल मीडियावर #घरापासून_दूर चा जोरदार ट्रेंड दिसत आहे. यात हेमंत ढोमे, ललित प्रभाकर, क्षिती जोग, चिन्मय मांडलेकर अशा काही कलाकारांचा समावेश आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे, याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात असतानाच आता या हॅशटॅगमागे लपलेले गुपित सर्वांच्या समोर आलं आहे. झिम्मा या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक-अभिनेता हेमंत ढोमेचा आगामी चित्रपट 'सनी' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं टीजर सोशल मीडियावर झळकलं असून #घरापासूनदूरचं उत्तर सर्वांना मिळालं आहे.

टीजरमध्ये ललित प्रभाकर म्हणजेच 'सनी' शिक्षणासाठी परदेशात गेल्याचं दिसत असून तो पाठीमागे काहीतरी सोडून आल्याची त्याला सतत जाणीव होतेय. असं म्हणतात, लांब गेल्यावरच जवळच सापडतं. असाच काहीसा अनुभव सनीला येत असल्याचं यात दिसतंय. त्याच्या मनात चाललेली ही चलबिचल नेमकी कशासाठी आहे, याचं उत्तर प्रेक्षकांना 18 नोव्हेंबरला मिळणार आहे. क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित, या चित्रपटाचं लेखन इरावती कर्णिक यांनी केलं असून अक्षय बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस, उर्फी काझमी यांनी 'सनी' चित्रपटाची निर्मिती केली आहे. सोबतच संतोष खेर आणि तेजस्वनी पंडित या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

'सनी'बाबत बोलताना दिग्दर्शक हेमंत ढोमेनं सांगितलं की, '' खरंतर ही माझीच गोष्ट आहे पण कधी ना कधी घरापासून दूर राहिलेल्या प्रत्येकाची गोष्ट आहे. अनेकदा असं होतं की, घरापासून दूर गेल्यावर काही गोष्टींची किंमत आपल्याला कळते आणि कदाचीत नवी नाती, नवं जग सापडतं.

आपल्या आयुष्याला नवा आकार येतो आणि आपली सर्वार्थाने वाढ होते. हेच अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न 'सनी'मध्ये करण्यात आला आहे. संपुर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा हा एक मजेशीर चित्रपट आहे.''

View this post on Instagram

A post shared by @lalit.prabhakar

(हे वाचा:'बिग बॉस मराठी' विजेता शिव ठाकरे दिसणार Bigg Boss 16 मध्ये; मेकर्सने दिली मोठी ऑफर? )

या चित्रपटात मराठीतील हन्डसम हंक अभिनेता ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत आहे. या टीजरमध्ये ललित अगदी कूल अंदाजात दिसून येत आहे. नुकतंच ललित प्रभाकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टवर प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. चित्रपटाचा टीजर पाहूनच प्रेक्षक प्रचंड उत्सुक झाले आहेत.

First published:

Tags: Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment