जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / दिग्दर्शकानंतर हर हर महादेव सिनेमाच्या वादावर Zee Studioचा खुलासा; म्हणाले, इतिहास गैरपद्धतीनं...

दिग्दर्शकानंतर हर हर महादेव सिनेमाच्या वादावर Zee Studioचा खुलासा; म्हणाले, इतिहास गैरपद्धतीनं...

हर हर महादेव

हर हर महादेव

हर हर महादेव सिनेमाच्या वादावर दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांच्यानंतर झी स्टुडिओनं देखील खुलासा करत पत्र लिहिलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 08 नोव्हेंबर : हर हर महादेव हा सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात आलाय. राजकीय पक्ष तसंच अनेक संघटनांकडून सिनेमाला विरोध दर्शवण्यात आला आहे. सिनेमातील इतिहास हा तोडून मोडून दाखवण्यात आल्याचा आरोप दिग्दर्शकावर करण्यात आला आहे. परिणामी मागील दोन दिवसात हर हर महादेव सिनेमाचे ठाणे तसेच पुण्यातील शो बंद पाडण्यात आले. सिनेमाच्या टीमला संभाजी ब्रिगेडकडून कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत अखेर वादावर मौन सोडलं. त्यानंतर आता सिनेमाच्या वादावर झी स्टुडिओनं भाष्य करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. हर हर महादेव सिनेमाच्या वादाप्रकरणी झी स्टुडिओनं खुलासा करत एक सविस्तर पत्र शेअर केलं आहे. ज्यात त्यांनी म्हटलंय, ‘छत्रपती शिवाजी महाराजा म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राची अस्मिता! त्यांची मूल्ये हृदयाशी बाळगूनच आपण वाटचाल केली आहे. त्यामुळे त्यांची कामगिरी, त्यांचा इतिहास गैरपद्धतीने प्रेक्षकांसमोर पोहोचणार नाही याची आम्ही पूर्ण खबरदारी घेतली आहे. तज्ज्ञ इतिहासकारांचा सल्ला घेऊन आणि इतिहासाच्या अनेक प्रवाहांचा/ विचारांचा अभ्यास करुन, संदर्भ घेऊन आम्ही हर हर महादेवची निर्मिती केली आहे. आम्हाला विश्वास आहे, छत्रपती शिवराय आणि त्यांच्या वीर योद्धांप्रती आम्हाला असलेला आदर सिनेमा पाहणाऱ्यांना नक्कीच पटेल’. हेही वाचा -  ‘हर हर महादेव’ सिनेमाचा वाद आणखी चिघळला; संभाजी ब्रिगेडकडून कायदेशीर नोटीस

जाहिरात

तर पुढे त्यांनी माफी देखील मागितली आहे. पत्रात पुढे म्हटलंय, ‘या चित्रपटाच्या माध्यमातून कोणाच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नसून छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपल्या भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा शुद्ध हेतू आहे. सामान्य प्रेक्षकांवर झालेला हल्ला हा निर्षधार्ह आहे. आमच्या राज्याचा कायदा आणि सुव्यवस्था प्रणालीवर संपूर्णपणे विश्वास आहे’. दरम्यान सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची बाजू मांडली. सिनेमा न पाहताच त्यावर टीका केली जातेय. आधी सिनेमा पाहा मग ठरवा. ज्या सीनवर आक्षेप घेताय ते सीन सेन्सॉर बोर्डाला आम्ही सबमिट केले आणि त्यांनी ते मान्य केलेत. तसंच प्रेक्षकांना मारहाण करणाऱ्यांनी महाराजांची आणि संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी,अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात