मुंबई 27 जुलै : अभिनेत्री ट्विंकल खन्नाची (Twinkle Khanna) बहीण अभिनेत्री रिंकी खन्ना (Rinke Khanna) देखील कधी काळी बॉलिवूड अभिनेत्री होती. 1999 साली 'प्यार में कभी कभी' (Pyar me kabhi kabhi) या चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. रिंकीचा आज 44 वा वाढदिवस आहे, त्यामनिमित्त जाणून घ्या रिंकी विषयी खास गोष्टी.
रिंकी ही अभिनेता राजेश खन्ना (Rajesh Khanna) आणि डिम्पल कपाडिया (Dimple Kapadia) यांची लहान मुलगी आहे. तर अभिनेता अक्षय कुमारची (Akshay Kumar) ती मेहूनी आहे. रिंकी ने बॉलिवूडमध्ये केवळ 4 वर्षे काम केलं होतं त्यानंतर तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला.
'प्यार में कभी कभी' या पहिल्या चित्रपटानंतर ती 'जिस देश में गंगा रहता है' या चित्रपटातही दिसली होती. पण रिंकी च बॉलिवूड करियर फार उंचीवर पोहोचलं नव्हतं. 2003 साली तिने चमेली या चित्रपटात काम केलं पण त्यानंतर मात्र ती चित्रपटात दिसली नाही.
रिंकीने 9 चित्रपटांत काम केलं होतं. त्यानंतर तिने बिझनेसमन समीर सरण याच्याशी विवाह केला. त्यानंतर ती अनेक वर्षांपासून लंडनमध्येच राहत आहे. रिंकी ला दोन मुलंही आहेत. अक्षय कुमार आणि रिंकीची फॅमिली अनेकदा एकत्र दिसतात. रिंकी अनेकदा भारतात आल्यानंतर बहिण ट्विंकल खन्ना सोबत दिसते.
बॉलिवूड ला राम राम केल्यानंतर रिंकी सामान्य स्त्री प्रमाणे लंडन मध्ये जीवन जगत आहे. याशिवाय रिंकी हे तिचं खरं नाव नसून रिंकल (Rinkle Khanna) हे तिचं नाव आहे पण तिने रिंकी हे स्क्रीन नेम अडोप्ट केलं होतं.
Published by:News Digital
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.