अनेकांच्या मनावर सध्या राज्य करत असलेला एकमेव अभिनेता म्हणजे सोनू सूद. एक अभिनेता म्हणूनच नाही तर माणूस म्हणूनही सोनू स्वतःची गेल्या काही दिवसांत ओळख निर्माण केली आहे. सोनू आज त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. ३० जुलै १९७३ ला सोनूचा पंजाबमध्ये जनम झाला होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या लव्ह लाईफ विषयी.
सोनूची पत्नी सोनाली सूद ही नेहमीच लाईम लाइट पासून दूर राहीली आहे. चित्रपटसृष्टीत नसली तरीही ती मीडियापासून दूरच असते. सध्या सोनू हा एक प्रसिद्ध अभिनेता असला तरीही एक काळ होता जेव्हा सोनू्च्या पत्नीला त्यांच अभिनय़ क्षेत्र पसंत नव्हतं. व तिने त्याला यात करिअर न करण्याचा सल्ला ही दिला होता.
दरम्यान सोनू आणि सोनाली यांची इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये ओळख झाली होती. सोनू हा पंजाबी आहे तर सोनाली साउथ इंडीयन. सोनाली ही त्याच्या आयुष्यात येणारी पाहिलीच मुलगी होती. असंही सोनूने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
काही दिवस डेट केल्यानंतर सोनू आणि सोनाली यांनी १९९६ साली विवाह केला होता. त्यावेळी सोनू हा इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी फार स्ट्रगल करत होता. इंजिनीयरिंग स्टुडंट असूनही त्याला अभिनयाची आवड असल्याने त्याने त्यातच करिअर करणं पसंत केलं होतं.
सोनू आणि सोनाली यांना दोन मुलंही आहेत. हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांच्या चित्रपटांत सोनूने काम केलं. विलन म्हणून त्याची चांगली ओळख निर्माण झाली होती. पूर्वी अभिनेता होऊ नको म्हणणाऱ्या पत्नीला आता आपल्यावर फार गर्व असल्याचं त्याने म्हटलं होतं.
कोरोना काळात सोनूने केलेल्या कामाची दखल सर्वच थरांतून घेण्यात आली. नुसतच आश्वासन नाही तर प्रत्यक्षात काम करूण सोनूने अनेकांनी मनं जिंकली. अजूनही सोनूचं काम अविरत सुरू आहे. त्यात त्याला त्याच्या कुटुंबिंयाचाही तितकाच पाठिंबा मिळतो.