'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) मधील कोणत्याही पात्राची वेगळी ळख करून देण्याची गरज नाही. माधवी हे पात्र साकारणारी अभिनेत्री सोनालिका जोशी (Sonalika Joshi) यांचा आजा वाढदिवस. पाहा सोनालिका कश्या झाल्या माधवी भाभी.
मालिकेतील माधवी भिडे हे पात्र अगदी सुरुवातीपासून सोनालिका साकारत आहेत. त्यामुळे त्यांची वेगळी अशी ओळख निर्माण झाली आहे.
सोनालिका यांचा जन्म मुंबईत एका हिंदू मराठी कुटुंबात झाला होता. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.
त्यांना 'झुळूक' या मराठी चित्रपटातही ताम केलं होतं. याशिवाय 'वाढता वाढता वाढे', 'बोल बच्चन' यासांरख्या अनेक नाटकांतही काम केलं होतं.
2008 साली त्यांना 'तारक मेहता…' ही मालिका मिळाली. मंदार चांदवडकर यांच्यासोबत त्या मिसेस भिडे हे पात्र साकरतात. त्यांच्या अभिनयाचं मोठं कौतुकही होतं.
गेली १३ वर्षे ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. यातील प्रत्येक पात्र विशेष लोकप्रिय ठरलं आहे.