HBD: Fitness queen शिल्पा शेट्टीने जाहिरातीतून केली करिअरला सुरुवात; आज आहे कोट्यवधींची मालकीन

HBD: Fitness queen शिल्पा शेट्टीने जाहिरातीतून केली करिअरला सुरुवात; आज आहे कोट्यवधींची मालकीन

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) आज वाढदिवस. शिल्पा आज अभिनयासोबतच एक बिजनेस वुमन असून कोट्यवधींची मालकीनदेखील आहे.

  • Share this:

मुंबई 8 जून: बॉलिवूडची फिटनेस क्वीन अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) आज वाढदिवस. शिल्पाचा जन्म 8 जून 1975 ला मंगरुळू, कर्नाटकात झाला होता. शिल्पाने अगदी शालेय जीवनापासूनच विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. तर शाळेत असताना ती स्पोर्ट्समध्ये फार सक्रिय होती. तसेच व्हॉलीबॉल टीमची ती कॅप्टन देखील होती.

मुंबईत शिल्पाचं बालपण गेलं. तसेत मुंबईतच तिने शिक्षणही पूर्ण केलं होतं. शिल्पाने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतरच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. तिने लिम्कासाठी टीव्हीवर पहिली जाहिरात केली. त्यानंतर शिल्पाला चित्रपटांसाठी ऑफर्स मिळू लागल्या. पण शिल्पाचं मॉडेलिंग हे सुरूचं होत. शिल्पा एक ट्रेन भरतनाट्यम डान्सरदेखील आहे.

‘सुशांतच्या बहिणीनंच लावली ड्रग्जची सवय’; NCB समोर रिया चक्रवर्तीचा खळबळजनक खुलासा

1993 मध्ये तिने तिच्या पहिल्या चित्रपटात केलं. बाजीगर या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान आणि काजोल यांच्यासोबत ती झळकली होती. यानंतर शिल्पाने अनेक सुपरहीट चित्रपटांत काम केलं.‘मै खिलाडी तु अनाडी’, ‘हाखखंडी’, ‘इन्साफ’, ‘जमीर’, ‘धडकन’ असे अनेक सुपरहीट चित्रपट तिने दिले.

शिल्पा ही एक योग साधक असून गेल्या अनेक वर्षांपासून ती योग करत आहे. त्यामुळेच शिल्पा ही अतिशय फिट असून अनेकजन तिच्या फिटनेसचे चाहते आहेत. ती नियमित योगा करते. तसेच इतरांनाही फिट राहण्याचा सल्ला देते. तिने अनेक फिटनेस कॅम्पेन्स देखील केले आहेत. याशिवाय तिला डान्स आणि जेवन बनवण्यातही रस आहे. तिचा एक कुकींग शो देखिल ती सोशल मीडियावर पोस्ट करते.

याशिवाय शिल्पा एक बिजनेस वुमन देखील आहे. काही वर्ष ती राजस्थान आयपीएल टीमची मालक होती. तिने टीमचा को ओव्हनर राज कुंद्रा (Raj Kundra) याच्याशी 2009 मध्ये विवाह केला. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. याशिवाय शिल्पाने काही चित्रपटांची निर्मिती देखिल केली आहे. बॉलिवूडमधील फार कमी लोकांकडे स्वतःच प्रायव्हेट जेट आहे. त्यातील एक शिल्पा देखील आहे.

Published by: News Digital
First published: June 8, 2021, 10:12 AM IST

ताज्या बातम्या