80 आणि 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री संगीता बिजलानीचा आज वाढदिवस. संगीता ने अभिनय आणि मॉडेलिंग दोन्ही क्षेत्रात नाव कमावलं होतं. पण अभिनेता सलमान खान मुळे आजही तिची चर्चा होते. वाचा संगीताच्या वाढदिवसानिमित्त तिच्या खास गोष्टी.
संगीताचा जन्म 1960 साली मुंबईत एका हिंदू सिंधी कुटुंबात झाला होता. श्रीमंत कुटुंबात जन्मलेली संगीता महत्वकांक्षी होती. संगीताला सुरुवातीपासूनच मॉडेलिंग क्षेत्रात फार रस होता. त्यामुळे तिने याचं क्षेत्रात करियर करायचं ठरवलं होतं.
वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षीच संगीताने मॉडेलिंग करायला सुरुवात केली होती. काही वर्षे तिने मॉडेलिंग केलं तेव्हा तिला बिजली हे नावही मिळालं होतं. 1980 साली तिने मिस इंडिया हा किताब जिंकला होता.
मॉडेलिंग नंतर संगीताने अभिनय क्षेत्रात रस घ्यायला सुरुवात केली. 1887 साली तिने 'कैदी' या चित्रपटातून आपल्या करियर ला सुरुवात केली होती. यानंतर संगीता त्रिदेव, गांव के देवता, जुर्म, खून का कर्ज, लक्ष्मण रेखा आणि निर्भय या चित्रपटांत ती झळकली.
प्रोफेशनल लाईफ इतकचं तिचं वैयक्तिक आयुष्य ही फार चर्चेत राहिलं होतं, जेव्हा संगीता आणि सुपरस्टार सलमानचे सुत जुळले होते. सलमान पेक्षा 5 वर्षे मोठी असणारी संगीता सलमाच्या प्रेमात पडली होती. दोघांचही अफेयर काही काळ सुरू होतं. इतकचं नाही तर लग्नाच्या पत्रिकाही छापल्या होत्या. पण त्यानंतर संगीताने या लग्नाला नकार दिला होता. सलमान तिला धोका देत आहे असं तिला वाटतं होतं. याचा खुलासा स्वतः सलमाननेच एका मुलाखतीत केला होता.
यानंतर संगीताने काही काळ काम केल्यानंतर 1996 साली क्रिकेटर मोहमद अझ्झरुद्दिन याच्याशी विवाह केला. त्यासाठी तिने इस्लाम धर्म ही स्वीकारला होता. तिने आईशा हे नाव ठेवलं होतं. पण काही काळातच हे लग्नही मोडल. 2010 साली दोघांनीही घटस्फोट घेतला.