मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Rahul Roy Birthday: आईसोबतच अफेयरच्या चर्चा,पत्नीसोबत घटस्फोट; सिनेमाच्या कथेलाही मागे टाकेल 'आशिकी' बॉय राहुल रॉयचं आयुष्य

Rahul Roy Birthday: आईसोबतच अफेयरच्या चर्चा,पत्नीसोबत घटस्फोट; सिनेमाच्या कथेलाही मागे टाकेल 'आशिकी' बॉय राहुल रॉयचं आयुष्य

राहुल रॉय

राहुल रॉय

Happy Birthday Rahul Roy: बॉलिवूड अभिनेता राहुल रॉयने 1990 च्या सुपरहिट चित्रपट 'आशिकी'मधून आपल्या सिने करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटाने त्याला रातोरात स्टार बनवलं होतं. रोमँटिक हिरोच्या रुपात राहुलने रुपेरी पडद्यावर अशी जादू पसरवली की त्याला एक लव्हर बॉय समजलं जात होतं.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 9 फेब्रुवारी- बॉलिवूड अभिनेता राहुल रॉयने 1990 च्या सुपरहिट चित्रपट 'आशिकी'मधून आपल्या सिने करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटाने त्याला रातोरात स्टार बनवलं होतं. रोमँटिक हिरोच्या रुपात राहुलने रुपेरी पडद्यावर अशी जादू पसरवली की त्याला एक लव्हर बॉय समजलं जात होतं. परंतु या सिनेमामुळे याला जशी प्रसिद्धी मिळाली तशी इतर कोणत्याही सिनेमातून मिळू शकली नाही. अभिनेता राहुल रॉय आज आपला 55वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने अभिनेत्याच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टींवर एक नजर टाकूया.

9 फेब्रुवारी 1968 रोजी कोलकाता येथे जन्मलेला राहुल त्याचा 55 वा वाढदिवस साजरा करत आहे.राहुलने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. तसेच असंदेखील म्हटलं जातं की, राहुलला त्याचा पहिला चित्रपट लक बाय चान्स मिळाला होता. मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत राहुलने सांगितलं होतं की, त्याची आई इंदिरा रॉय या लेख लिहायच्या. महेश भट्ट एकदा राहुलच्या घरी आईला भेटायला आले होते. त्यांच्या संभाषणादरम्यान महेश यांची नजर राहुलच्या फोटोंवर पडली, फोटो पाहून महेश भट्ट यांनी त्याला लगेचच 'आशिकी' ऑफर केली.हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. हा चित्रपट एक-दोन नव्हे तर तब्बल सहा महिने हाऊसफुल्ल चालला होता. या सिनेमातील गाणी आणि राहुल-अनुची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती.

(हे वाचा: Bigg Boss 16: मालिकांपूर्वी लोखंडवलातील मोबाईल दुकानात कामाला होता शालिन भनौत; स्पर्धकाबाबत 'या' गोष्टी तुम्हालाही करतील थक्क)

परंतु नंतर राहुलचा जादू फारसा चालला नाही. राहुल रॉयचे 25 चित्रपट फ्लॉफ झाले आणि राहुलला फ्लॉप अभिनेता म्हणून ओळखले जाऊ लागले. 'सपने साजन के', 'गुमराह' आणि महेश भट्टचा 'जुनून' यासह काही चित्रपटांनीही चांगली कमाई केली असली तरी. महेश यांच्या जुनूनमध्ये त्याला लव्हरबॉय नव्हे तर निगेटिव्ह रोल मिळाला होता. राहुलचा अभिनय सर्वांना आवडला पण त्याच्या करिअरचा आलेख उंचावण्यास तो सिनेमाही उपयुक्त ठरला नाही. अनेक वर्षानंतर, जेव्हा तो टीव्हीचा प्रसिद्ध शो 'बिग बॉस' सीझन 1 चा विजेता बनला तेव्हा तो पुन्हा प्रकाशझोतात आला होता.

आईसोबतच अफेयरच्या चर्चा-

राहुल रॉयने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत एक धक्कादायक गोष्ट सांगितली होती. अभिनेत्याने खुलासा करत म्हटलं होतं की, 'मी एकेदिवशी माझ्या मित्रांसोबत एका रेस्टोरंटमध्ये पार्टीसाठी गेलो होतो. दरम्यान माझी आईसुद्धा त्याचठिकाणी आलेली होती. त्यावेळी मी आणि आईने एक डान्स केला होता. दुसऱ्या दिवशी एका वृत्तपत्राने असं छापलं की, राहुल रॉय एका वयाने मोठ्या महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये असून तो त्यांच्यासोबत डान्स करताना दिसून आला'. यावर राहुल प्रचंड भडकला होता. त्याने यावर प्रतिक्रिया देत म्हटलं होतं की, असं काही लिहिण्याआधी एकदा जाणून तर घ्या की त्या कोण आहेत.

राहुलच्या खाजगी आयुष्याबाबत सांगायच झालं तर, त्याने 2000 मध्ये राजलक्ष्मी एम रॉयशी लग्न केलं होतं. परंतु जवळपास 14 वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघे विभक्त झाले आहेत. आयुष्यात अनेक चढउतार पाहणाऱ्या राहुलचा लूक आता प्रचंड बदलला आहे. एककाळ असा होता की राहुलला एकत्र तब्बल 60 चित्रपट ऑफर झाले होते. त्यातील त्याने 47 सिनेमे स्वीकारले होते. तरीसुद्धा अभिनेता आशिकीसारखा सुपरहिट चित्रपट देऊ शकला नाही.

First published:

Tags: Bollywood, Entertainment