जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / HBD Prachi Desai: TV नंतर बॉलिवूडमध्येही दाखवली जादू; अजय देवगणला सुनावले होते खडेबोल

HBD Prachi Desai: TV नंतर बॉलिवूडमध्येही दाखवली जादू; अजय देवगणला सुनावले होते खडेबोल

HBD Prachi Desai: TV नंतर बॉलिवूडमध्येही दाखवली जादू; अजय देवगणला सुनावले होते खडेबोल

अभिनेत्री प्राची देसाईने (Prachi Desai) टेलिव्हीझन ते बॉलिवूड (Bollywood) अशी आपली ओळख निर्माण केली आहे. ‘कसम से’ या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 12 सप्टेंबर : अभिनेत्री प्राची देसाईने (Prachi Desai) टेलिव्हीझन ते बॉलिवूड (Bollywood) अशी आपली ओळख निर्माण केली आहे. ‘कसम से’ या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. ग्रेज्युएशनच्या वेळी तिला मॉडलिंग करण्याची संधी मिळाली. तेव्हा तिने कसम से या मालिकेसाठी ऑडीशन दिलं आणि तिची निवड देखील झाली. अगदी कमी वयातचं तिने टेलिव्हिझनमध्ये मोठी ओळख मिळाली होती. ‘रॉक ऑन’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. यानंतर प्राची देसाई ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुम्बई’, ‘बोल बच्चन’, ‘आय मी और मैं’ या चित्रपटांतही दिसली होती. प्राची देसाई मागील काही वर्षांपासून चित्रपटातून गायब आहे. दरम्यान उत्तम अभिनय कौशल्य आणि सुंदरता असतानाही प्राचीला जास्त चित्रपट मिळाले नाहीत. त्यामुळे सध्या चित्रपटांत दिसत नाही. मात्र सोशल मीडियावर ती फार सक्रिय असते.

जाहिरात

प्राचीचा जन्म 12 सप्टेंबर 1988 साली सुरतमध्ये झाला होता. अभिनेत्री प्राची देसाई मागील काही दिवसांत चर्चेत होती. ज्यामुळे तिने अभिनेता अजय देवगनला सणसणीत उत्तर दिलं होतं. दरम्यान अजय देवगनने (Ajay Devgn)  बोल बच्चन चित्रपटाच्या रिलीझ अँनीव्हर्सरीला सर्व कलाकारांना सोशल मीडियावर टॅग केलं होतं मात्र काहींना वगळण्यात आलं होतं. ज्यात प्राचीचा देखील समावेश होता.

प्राचीने लिहिलं होतं, ‘अजय देवगण तुम्ही चित्रपटाचे अन्य स्टार्स जसे असिन, कृष्णा अभिषेक, अर्चना पूरण सिंह, असरानी जी, नीरज वोरा आणि जीतू वर्मा यांना टॅग करायला विसरलात ज्यांनी चित्रपट सुपरहिट केला होता. त्यामुळे प्राची तिच्य़ा बेधड ट्वीटमुळे चर्चेत आली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात