त्रिपाठी यांनी आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर केल्यानंतर त्यांना अनेक ऑफर्स मिळू लागल्या आहेत. तर त्यासाठी त्यांना मोठी रक्कम देखील मिळते. कॉमेडी, विलन, सकारात्मक सगळ्या प्रकारची पात्र त्यांनी साकारली आहेत. तर प्रत्येक वेळी त्यांच्या अभिनयाची छबी दिसून आली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त वेबसीरिजमुळे त्यांना मोठी ओळख मिळाली.View this post on Instagram
2019 मध्ये पंकज त्रिपाठींनी मुंबईतील महागड्या मड आयलंड या ठिकाणी घर खरेदी केलं होतं. अलिशान घराचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. दरम्यान एक असाही काळ होता, जेव्हा त्रिपाठी यांना मुंबईत एका खोलीत राहावं लागलं होतं. कठीण परिस्थितीत आपली पत्नी आपल्यासोबत होती असंही त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. एका खोलीत राहणारे पंकज आज काही बॉलिवूड स्टार्सचे शेजारी आहेत. ज्यात जॅकी श्रॉफ, गोविंदा तसेच आमिर खानचाही समावेश आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Pankaj tripathi