मराठी सिनेसृष्टीतील एक लाडकी नायिका म्हणजेच अभिनेत्री निवेदिता जोशी- सराफ. निवेदिता यांनी आजवर अनेक वर्षे प्रेश्रकांच्या मनावर राज्य केलं तर अजूनही करत आहेत. पाहा कसा होता त्यांचा अभिनय प्रवास.
निवेदिता यांनी बालकलाकार म्हणून अवघ्या वयाच्या १० व्या वर्षा आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. अपनापण हा हिंदी चित्रपट त्यांचा पहिला चित्रपट होता.
नवरी मिळे नवऱ्याला हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता. 1984 साली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
1990 मध्ये निवेदिता यांनी अभिनेते अशोक सराफ यांच्याशी विवाह केला. त्यांना अनिकेत सराफ नावाचा मुलगा आहे.
90 च्या धसकात त्या अनेक सुपरहिट चित्रपटांत झळकल्या. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी गारुड केलं होतं.
धुम धडाका, दे दनादन, अशी ही बनवाबनवी, बाळाचे बाप ब्रम्हचारी असे अनेक सुपरहिट चित्रपट त्यांच्या नावावर आहेत.