
टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता निखिल चव्हाण (Nikhil Chavan) सध्या त्याच्या मालिकेमुळे चर्चेत असतो. पण निखिलने एक थिएटर बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. पाहा असा होता निखिलचा अभिनय प्रवास.

निखिलची राजवीर सुर्यवंशी ही व्यक्तिरेखा अनेकांना पसंत पडत आहे. तर त्याच्या लूकची साउथ हिरो देवरकोंडासोबतही तुलना केली जात होती.

निखिल थिएटर मध्ये पडद्यामागील लहान कलाकार म्हणून काम करत होता. पण आपल्या अभिनय कौशल्याने त्याने मुख्य भूमिकेपर्यत झेप घेतली आहे.

निखिलने याआधी अनेक लहान मोठी पात्र साकारली आहेत. लागीर झालं जी या लोकप्रिय मालिकेत त्याने पात्र साकारलं होत. ज्यातून त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली होती.

मालिकाव्यतिरिक्त तो काही चित्रपटांतही झळकला आहे. काही दिवसांपूर्वीच तो डार्लिंग या चित्रपटात दिसला होता.




