मुंबई, 10 जून- बॉलिवूड (Bollywood) गायक मिका सिंह (Mika Singh) हे नाव आता सर्वानांच परिचयाचं आहे. या गायकाने आपल्या दमदार आवाजाने सर्वानांच भुरळ घातली आहे. मिका सिंह हा एक प्रसिद्ध गायक, रॅपर आहे बॉलिवूडला एकापेक्षा एक सर्वोत्तम गाणी दिली आहेत. 'मौजा ही मौजा', 'धन्नो' सारखी ब्लॉकबस्टर गाणी आजही प्रत्येकाच्या तोंडात असतात. हा लोकप्रिय गायक आज आपला 45 वा वाढदिवस (Mika Singh 47 th Birthday) साजरा करत आहे. यानिमित्ताने त्यांच्या नेटवर्थ आणि संपत्तीबाबत थोडीशी माहिती घेऊया.
मिकाचा जन्म 10 जून 1977 रोजी पश्चिम बंगालमधिल दुर्गापूर येथे झाला होता. या गायकने अनेक सोलो अल्बम्स केले आहेत. या अल्बम्सला चाहत्यांकडून तुफान प्रेमसुद्धा मिळालं आहे. तसेच मिकाने बरेच रिअॅलिटी शोदेखील केले आहेत. मिका सिंहने आपल्या कष्टातून आणि आपल्या कलेच्या जोरावर आज कोट्यावधींची संपत्ती कमावली आहे. त्याला महागड्या गोष्टींची प्रचंड आवड आहे. मिका आज एक आलिशान आयुष्य जगताना दिसून येतो.
मिका सिंह हा प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांचा लहान भाऊ आहे. देशातच नव्हे तर विदेशातसुद्धा मिका स्टेज शो करत असतो. त्याच्या कॉन्सर्टसना तुफान गर्दी पाहायला मिळते. आपल्या सुपरहिट गाण्यांमुळे मिकाने कोट्यावधींची संपत्ती कमावली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिका त्याच्या एका गाण्यासाठी सुमारे 15 लाख रुपये घेतो. चित्रपटांतील गाण्यांसोबतच मिकाचे अल्बमही हिट आहेत. या लोकप्रिय गायकाला आलिशान घरे आणि आलिशान वाहनांची आवड आहे. आणखी एका रिपोर्टनुसार, मिका सिंहची एकूण संपत्ती सुमारे 13 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 96 कोटी रुपये इतकी आहे. मिका विविध सामाजिक उपक्रम करतानासुद्धा दिसून येतो.
(हे वाचा:Samantha Instagram: समंथा प्रभू एका इन्स्टाग्राम पोस्टमधून मिळवते तब्बल इतके कोटी, जाणून व्हाल थक्क )
मिका सिंह नेहमीच त्याचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतो. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिकाने यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण पंजाबी गायक-रॅपर सिद्धू मूसेवाला यांची हत्या आणि प्रसिद्ध गायक केके यांच्या मृत्यूने मिका प्रचंड दुःखी आहे. त्यामुळेच त्याने हा निर्णय घेतला आहे.कामाबाबत बोलायचं झालं तर, सध्या मिका आपल्या स्वयंवरमुळे चर्चेत आहे. 19 जूनपासून प्रसारित होणाऱ्या या स्वयंवर शोसाठी देशभरातील सुमारे 70 मुलींच्या ऑडिशन घेण्यात आल्या होत्या. आणि यामधून 12 मुलींना निवडण्यात आलं आहे.या बारा मुलींमधून मिका आपली पत्नी निवडणार असल्याचं म्हटलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.