एकता कपूरने टीव्हीवर एक काळ गाजवला आहे. तिच्या एकाहून एक मालिका लाखो प्रेक्षकांवर आजही भुरळ घालत आहेत. कोणत्या आहेत या मालिका?
पवित्र रिश्ता ही अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत यांची मुख्य भूमिका असणारी मालिका अनेक वर्ष लोकांचं मनोरंजन करत होती. मानव आणि अर्चना यांची ही प्रेमकथा सुंदर गुंफलेली होती
क्यूकी सास भी कभी बहू थी ही ८ वर्ष टीव्हीवर गाजलेली मालिका तिचं नंबर 1 चं स्थान राखून होती. या मालिकेत दाखवलेलं कुटुंब आणि त्यांची गोष्ट कायमच हिट ठरली. स्मृती इराणी यांची यात मुख्य भूमिका होती.
कहानी घर घर की या मालिकेने सुद्धा प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. ही मालिका सुद्धा आठ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती.
दिव्यांका त्रिपाठी आणि करणं पटेल यांच्या मुख्य भूमिकेने सजलेली यह है मोहोब्बते मालिका त्याच्या आगळ्या वेगळ्या प्रेमकहाणीमुळे खूप प्रसिद्ध झाली होती. इशिता आणि रमण यांच्यातील गोड रुसवे-फुगवे आणि प्रेम सर्वांनाच आवडलं होतं. (फोटो सौजन्य- yeh.hai.mohabbatein.yhm)
साक्षी तंवर आणि राम कपूर यांच्या बडे अच्छे लागते है मालिकेने सुद्धा प्रचंड प्रेम आणि लोकप्रियता मिळवली होती. लग्न झाल्यानंतर बहरत जाणाऱ्या या प्रेम कहाणीला सर्वानीच पसंत केलं.
कलर्स वरील नागीण या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेडं केलं होतं. यात नागीण या पात्रासाठी असलेल्या सगळ्या अभिनेत्रीचं खूप कौतुक झालं.
श्वेता तिवारी ची मुख्य भूमिका असलेली मालिका कसौटी जिंदगी के ही मालिका आणि यातली अनेक पात्र प्रचंड गाजली. कोमोलिका, प्रेरणा, अनुराग, बजाज परिवार अशा अनेक गोष्टी आजही लोकांच्या लक्षात आहेत.