मराठीमध्ये असा एकही व्यक्ती नाही ज्याला अशोक सराफ हे व्यक्तिमत्त्व माहित नाही. (सौजन्य- ashoksarafofficialfc)
त्यांच्या इतकं अफाट विनोदाचं टायमिंग आजपर्यंत कोणालाच जमलं नाही. त्यांना अक्षरशः देवाकडून मिळालेली ही देणगी आहे.
अशी ही बनवाबनवी मधील धनंजय माने आणि त्याचे वारलेले सत्तर रुपये आज 30 वर्ष चित्रपटाला होऊन गेली तरी अजरामर आहेत. 'हा माझा बायको पार्वती' या डायलॉगची जादू काही वेगळीच आहे.
त्यांची धुमधडाका चित्रपटातील भूमिका यदुनाथ जवळकर आणि त्यांचा सुप्रसिद्ध डायलॉग 'व्याख्या विख्खी वुख्खु' याला आजही तोड नाही.
आज त्यांच्या पंचाहत्तरीत पदार्पण करताना अशोक मामा त्याच ताकदीने काम करत आहेत. त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभावं हीच त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. (फोटो सौजन्य- @ashoksarafofficialfc)