मुंबई, 12 जानेवारी- 80 च्या दशकात छोट्या पडद्यावरील 'रामायण' या मालिकेतील प्रभू राम अर्थातच अभिनेते अरुण गोविल आज आपला 65 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आजही लोक त्यांना प्रभू रामच्या भूमिकेसाठीच ओळखतात. त्यांनी आपल्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे की, या भूमिकेनंतर त्यांचं आयुष्य किती बदललं होतं. त्याकाळात लोक त्यांना खरोखरचा प्रभू राम समजत आणि त्यांच्या पायावर लोटांगण घालत. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहते सोशल मीडियावरुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. परंतु आज आपण पाहणार आहोत अरुण गोविल यांना प्रभू रामची भूमिका नेमकी मिळाली कशी?
'रामायण' या मालिकेत प्रभू रामची भूमिका साकारत अरुण गोविल प्रचंड लोकप्रिय झाले होते. या मालिकेने त्यांचं आयुष्यच बदलून गेलं होतं. या मालिकेने अरुण गोविल यांना अफाट लोकप्रियता मिळवून दिली होती. मालिकेने त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवलं होतं . मालिकेशिवाय जेव्हा ते बाहेर जात तेव्हा लोक त्यांना प्रभू राम समजून त्यांच्या पाया पडत असत.
(हे वाचा:Anu Aggarwal B'day: 'आशिकी गर्ल' अनु अग्रवाल आता दिसते अशी; एका घटनेनं बदललं अभिनेत्रीचं अख्ख आयुष्य )
प्रभू रामची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनी 'रामायण' आधी काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सांगायचं झालं तर, अरुण गोविल यांनाही आपली वाहिनी तब्बसूम यांच्या सांगण्यावरुन मनोरंजन सृष्टीत पाऊल ठेवलं होतं. त्यांनीच अरुण गोविल यांची भेट सुरज बडजात्या यांच्याशी घालून दिली होती. अरुण गोविल यांनी 1977 मध्ये एका चित्रपटातून आपला डेब्यू केला होता. त्यांचा 'सावन को आने दो' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. अरुण गोविल यांनी फक्त हिंदी नव्हे तर कन्नड, भोजपुरी,तेलुगू, बंगाली अशा अनेक भाषांमध्ये काम केलं आहे. परंतु त्यांना खरी ओळख प्रभू रामच्या भूमिकेत मिळाली होती.
View this post on Instagram
अशी मिळाली प्रभू रामची भूमिका-
अरुण गोविल यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र ते आजही आपल्या प्रभू रामाच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. एका मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्याला ही भूमिका कशी मिळाली याचा खुलासा केला होता. त्यांनी सांगितलं की, 'तेव्हा रामायणसाठी ऑडिशन सुरु होते. त्यावेळी मी रामानंद सागर यांना भेटायला पोहोचलो होतो. मला प्रभू राम किंवा लक्ष्मणच्या भूमिकेसाठी निवडलं जाणार होतं. परंतु मी प्रभू रामची भूमिका करायचं मनाशी ठरवलं होतं. पण मला रिजेक्ट करण्यात आलं होतं. त्यांनंतर काही दिवसांनी मला रामानंद सागर यांचा फोन आला आणि त्यांनी मला म्हटलं, प्रेक्षकांना तुमच्यासारखे प्रभू राम नाही मिळणार'. अशाप्रकारे रिजेक्शनमधून नंतर त्यांची निवड करण्यात आली होती.
का मिळालं होतं रिजेक्शन-
रामानंद सागर यांना प्रभू राम यांची भूमिका साकारण्यासाठी एक असा अभिनेता हवा होता जो अगदी निर्व्यसनी असेल. त्याला कोणत्याही प्रकारचं व्यसन किंवा वाईट सवय नसेल. परंतु अरुण गोविल त्यावेळी सिगारेट पीत असत. त्यामुळे त्यांना नकार देण्यात आला होता. परंतु त्यांना ही भूमिका साकारण्याची इतकी इच्छा होती की, त्यांनी तेव्हापासून सिगरेट सोडून दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Actor, Entertainment