मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO: हँडसम हंक भूषण प्रधान पाक कलेतही आहे पारंगत; बाप्पासाठी बनवला उकडीचा मोदक

VIDEO: हँडसम हंक भूषण प्रधान पाक कलेतही आहे पारंगत; बाप्पासाठी बनवला उकडीचा मोदक

भूषण प्रधानच्या घरी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणपती उत्सव साजरा केला जात आहे. तर यावेळी त्याने स्वतःच्या हाताने बाप्पासाठी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य बनवला आहे.

मुंबई 14 सप्टेंबर :  गणपती बाप्पा घरी आले म्हणजे उकडीचा मोदक (Steam Modak) हा होणारच. सध्या घरोघरी बाप्पांचं आगमन झालं आहे. सगळीकडे गणेशोत्सवाचा (Ganesh Chaturthi) माहोल पाहायला मिळत आहे. कोरोनाचे निर्बंध असेल तरीही भक्तीत कोणतीही कमी पाहायला मिळत नाही. अनेक मराठी सेलिब्रिटींच्या घरीही हीच धामधूम पाहायला मिळत आहे. तर अनेकांनी हाताने बाप्पांच्या मूर्तीही बनवल्या आहेत. अभिनेता भूषण प्रधानच्या (Bhushan Pradhan) घरीही बाप्पा आले आहेत.

भूषण प्रधानच्या घरी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणपती उत्सव साजरा केला जात आहे. तर यावेळी त्याने स्वतःच्या हाताने बाप्पासाठी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य बनवला आहे. आपल्या आईसोबत त्याने ही कलाही दाखवली आहे. हातावर सुंदर पिठाची पारी करून नंतर त्यावर कळया देत त्याने मोदक साकारला. हा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे नेहमी जिमचे व्हिडिओ शेअर करणारा भूषण स्वयंपाक कलेतही पारंगत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान भूषनच्या घरी काही मराठी सेलिब्रिटींनी ही बाप्पाचं दर्शन घेतलं. अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) आणि हेमांगी कवी (Hemangi Kavi) यांनी भूषणच्या घरी येऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. त्याचे फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

भूषण सध्या स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ‘जय भवानी जय शिवाजी’ (Jai Bhavani Jai Shivaji) या मालिकेत दिसत आहे. तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. त्याच्या लुकला चांगली पसंती मिळतानाही दिसत आहे.

First published:
top videos

    Tags: Marathi cinema, Marathi entertainment