जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मेरे बॉयफ्रेंड से गुलूगुलू करेगी तो...' Gully Boy चा डायलॉग ऐका रेखा यांच्या आवाजात

'मेरे बॉयफ्रेंड से गुलूगुलू करेगी तो...' Gully Boy चा डायलॉग ऐका रेखा यांच्या आवाजात

'मेरे बॉयफ्रेंड से गुलूगुलू करेगी तो...' Gully Boy चा डायलॉग ऐका रेखा यांच्या आवाजात

झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ सिनेमातील आलियाचा ‘मेरे बॉयफ्रेंड से गुलूगुलू करेगी तो…’ हा डायलॉग प्रचंड गाजला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 01 ऑक्टोबर : बॉलिवूडमध्ये मानाचा समजला जाणारा आयफा अवार्ड सोहळा काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये पार पडला. या अवॉर्ड सोहळ्याचं यंदाचं हे 20 वं वर्ष होतं. सर्वच तारे तारकांना या सोहळ्याला हजेरी लावली. मात्र या सोहळ्यात सर्वात भाव खाऊन गेल्या त्या जेष्ठ अभिनेत्री रेखा. रेखा यांचा या आवॉर्ड फंक्शनमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याचं कनेक्शन आलिया भटशी आहे. सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेल्या या व्हिडीओमध्ये रेखा सुपरहिट सिनेमा ‘गली बॉय’चा ‘मेरे बॉयफ्रेंड से गुलूगुलू करेगी तो…’ हा डायलॉग त्यांच्याच खास अंदाजात म्हणताना दिसत आहेत. आयफा अवॉर्डमध्ये रेखा यांच्या हस्ते आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी घडलेला किस्सा सध्या सर्वांच्याच पसंतीत उतरत आहे. आयफा अवॉर्डचं प्रसारण लवकरच कलर्स टीव्हीवर केलं जाणार असून त्याच्या प्रोमोमध्ये रेखा यांच्या अनोख्या अंदाजातला हा डायलॉग ऐकायला मिळत आहे. लता दीदींची Instagram वर एंट्री, फक्त ‘या’ 5 व्यक्तींना करतात फॉलो

जाहिरात

रणवीर सिंग आणि आलिया भट यांच्या ‘गलीबॉय’ चित्रपटाची ऑस्करसाठी अधिकृत एन्ट्री झाली आहे. भारताकडून या चित्रपटाची अधिकृतरित्या निवड करण्यात आलीय. या चित्रपटाचं दिग्दर्सन झोया अख्तर यांनी केलं आहे.गली बॉय सिनेमातून झोयाने स्ट्रीट रॅपरचा संघर्ष दाखवला आहे. मुंबईतल्या धारावी 17 मध्ये राहणाऱ्या मुरादच्या (रणवीर सिंग) संघर्षाची ही गोष्ट आहे. हॉट सीटवर बसून KBC खेळण्याऐवजी पतीशी भांडू लागली स्पर्धक, वाचा नक्की काय झालं ही कथा जरी मुरादची असली तरीही रणवीर सिंगपेक्षाही प्रेक्षकांना आवडते ती आलिया भट्ट. आलियाचं प्रतिकुल परिस्थितीतही प्रेमाची साथ न सोडण्याची जी जीगर असते त्याला अनेकजण दाद देतात. प्रेमासाठी निर्भिडपणे समाजाला तोंड द्यायची तिची हिंमत पाहण्यासारखी आहे. सिनेमा पाहताना रणवीर मुरादची व्यक्तिरेखा जसा जगला त्याचप्रमाणे आलियानेही सफिनाची व्यक्तिरेखा जगली असं म्हणावं लागेल. या सिनेमातील आलियाचा ‘मेरे बॉयफ्रेंड से गुलूगुलू करेगी तो…’ हा डायलॉग प्रचंड गाजला होता. जेव्हा ट्रम्प-मोदींसाठी अमेरिकन दूतावास गातं हे धम्माल गाणं, पाहा VIRAL VIDEO आलियाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर लवकरच ब्रह्मास्त्रमध्ये रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अयान मुखर्जीनं केलं असून यात अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ======================================================================= VIDEO : दुर्मीळ असा पोल्का डॉटेड झेब्रा, अंगावर नाहीत काळे पांढरे पट्टे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात