मुंबई11 जुलै- अनेक बॉलिवूड कलाकारांचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काहींचे शाळेच्या गणवेशातील फोटोही चर्चेत असतात. काही चाहते बालपणीच्या फोटोंवरून त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटीला ओळखू शकतात, तर काहींना मात्र ओळखता येत नाही. अशाच एका अभिनेत्रीचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दिसणारी शालेय मुलगी ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलंय. इतकंच नव्हे तर या अभिनेत्री आमीर खान, शाहरुख खान व सलमान खान या तिन्ही खानबरोबरही काम केलंय. तिचा पती हा प्रसिद्ध क्रिकेटर आहे. तुम्ही या अभिनेत्रीचा फोटो पाहा आणि ओळखण्याचा प्रयत्न करा. वाचा- या अभिनेत्रीनं दोनदा पळून जात केलं लग्न; पहिला नवरा सुपरस्टार तर दुसरा दिग्दर्शक या फोटोमध्ये निळा आणि पांढरा शाळेचा गणवेश घातलेल्या, दोन वेण्यांना लाल रिबिन बांधलेल्या या मुलीला नीट पाहा. ती कोण आहे हे तुम्ही ओळखलं का? तिचं सुंदर स्माईल पाहूनही तुम्ही तिला ओळखू शकला नसाल तर त्याचं उत्तर आम्हीच तुम्हाला सांगतो. या फोटोमध्ये असलेली ही मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आहे. या फोटोत ती खूप निरागस आणि क्युट दिसत आहे. हा फोटो तिच्या शाळेतील आहे. ती बेंगळुरूच्या आर्मी स्कूलमध्ये शिकत होती, तेव्हाचा हा फोटो आहे. यानंतर तिने बेंगळुरूच्या कॉलेजमधूनच कला शाखेत पदवी घेतली होती. अनुष्का शर्माचे वडिल आर्मी ऑफिसर होते, तिच्यासाठी अभिनयक्षेत्र नवीन होतं, त्यामुळे इंडस्ट्रीत नाव कमवणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. एक दिवस मॉलमध्ये शॉपिंग करत असताना तिला मॉडेलिंगची ऑफर आली. त्यानंतर अनुष्का मॉडेलिंगमधून बॉलिवूडची सुपरस्टार बनली. तिने 2008 मध्ये ब्लॉकबस्टर चित्रपट ‘रब ने बना दी जोडी’मधून बॉलिवूड पदार्पण केलं आणि त्यानंतर कधीही मागे वळून पाहिलं नाही. ऑडिशनच्या माध्यमातून तिला ही भूमिका मिळाली होती.
अनुष्काने ‘जब तक है जान’, ‘ए दिल है मुश्कील’, ‘पीके’, ‘सुलतान’, ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘बँड बाजा बारात’, ‘सुई धागा’, ‘झिरो’, ‘दिल धडकने दो’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मुलीच्या जन्मानंतर मोठ्या पडद्यापासून दूर असलेल्या अनुष्काचा लवकरच ‘चकडा एक्सप्रेस’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. यामध्ये ती प्रसिद्ध महिला क्रिकेटर झूलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे.