नवी दिल्ली, 13 मार्च: बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा (Geeta Basra) आज तिचा 38वा वाढदिवस साजरा करत आहे. गीताचा जन्म इंग्लंडच्या पोर्ट्समाउथ येथे एका पंजाबी कुटुंबात झाला होता. गीता तिथेच लहानाची मोठी झाली आणि नंतर भारतात स्थायिक झाली. 2006 मध्ये आलेल्या इमरान हाश्मीचासिनेमा ‘दिल दिया है’मधून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. गीता गेल्या काही वर्षांपासून ती बॉलिवूडपासून दूर आहे. गीता बॉलीवूड जगापेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली. 3 वर्ष डेटिंगनंतर टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंहसोबत(Indian Cricketer Harbhajan Singh) सात फेरे घेतले. गीता बसराची फिल्मी स्टाईल लव्हस्टोरी हरभजनने गीताला वो अजनबी गाण्यात पहिल्यांदा बघितले होते आणि ती त्याला आवडली होती. युवराज सिंगच्या मदतीने त्यांने गीताचा नंबर शोधला. गीताला मेसेज करत तिला कॉफी डेटवर बोलवले होते. गीताने 3 ते 4 दिवस त्याच्या मेसेजचा रिप्लॉय दिला नव्हता. भज्जी त्यावेळी साऊथ आफ्रिकेत होता आणि भारताने T-20 वर्ल्ड कप जिंकला होता. ज्यावेळी हरभजन भारतात परतला तेव्हा गीताने त्यांचे अभिनंदन केले होते. त्यानंतर गीताने हरभजनला मेसेज करुन आयपीएल मॅचची दोन तिकिटं मागितली होती. हरभजनने तिला तिकिट्स दिली आणि आयपीएल दरम्यान दोघांची पहिली भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. 2015 मध्ये गीता बसराने हरभजनसोबत लग्नगाठ बांधली. गीता आणि हरभजन दोघेही एकमेकांना 3 वर्षांहून अधिक काळ डेट करत होते. हरभजनसोबत लग्न केल्यानंतर गीता इंडस्ट्रीपासून पूर्णपणे दूर राहिली. एका मुलाखतीत गीताने धक्कादायक खुलासा केला होता. ‘द ट्रेन’ रिलीज होऊन काहीच दिवस झाले होते आणि माझे लक्ष करिअरवर होते. मला माहित होते, की जर मी रिलेशनशिपमध्ये पडले तर सर्व काही बदलेल. हरभजनने माझा 10 महिने पाठलाग केला. मला वाटते, की आम्हाला जवळ आणण्यात माध्यमांचा मोठा वाटा आहे. एकेदिवशी मला जाणीव झाली, की हरभजन चांगला व्यक्ती आहे आणि त्याच्यापेक्षा चांगला जोडीदार मला मिळून शकणार नाही. माझ्या फ्रेंड्सनाही तो आवडत होता आणि त्यांनीच मला या नात्यात पुढे जाण्यास सांगितले.’ तसेच, तिने एकदा हरभजनला दुसरी मुलगी शोधून तिच्याशी लग्न करण्याचा सल्ला दिला होता. ती सांगते, ‘एकदा मी त्याला म्हणाले होते, की माझ्याशी बोलू नकोस. मी माझ्या रस्त्याने जाईल आणि तू तुझ्या रस्त्याने जावे. मी त्याला म्हणाले होते, दुसरी मुलगी शोधून लग्न कर. त्यावेळी हरभजनला माझ्याशी लग्न करायचे होते. परंतु मला त्याच्याशी लग्न करण्याची मूळीच इच्छा नव्हती. परंतु आमच्या नशीबात वेगळेच लिहिलेले होते. जे व्हायचे होते ते झाले. काही महिन्यांनंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.’ अशी प्रतिक्रियी गीताने एका मुलाखतीत दिली होती. गीता आणि हरभजन या जोडीला दोन मुलं देखील आहेत. मनोरंजनविश्वापासून दूर असली तरी गीता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती दररोज मुलांसोबतचे आणि पतीसोबतचे फोटो शेअर करत असते. चित्रपटांपासून दूर असलेली गीता तिचे वैयक्तिक आयुष्य खूप एन्जॉय करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.