जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / गौरी खानकडून मुलगी सुहानाला खास 'Dating Tips', Koffee With Karanमध्ये उलगडणार गुपित

गौरी खानकडून मुलगी सुहानाला खास 'Dating Tips', Koffee With Karanमध्ये उलगडणार गुपित

गौरी खानकडून मुलगी सुहानाला खास 'Dating Tips', Koffee With Karanमध्ये उलगडणार गुपित

फिल्ममेकर करण जोहरचा बहिचर्चित शो म्हणजे ‘कॉफी विथ करण’. या टॉक शोमध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. सध्या कॉफी विथ करणचा 7 वा सीझन सुरु असून आगामी भागात शाहरुख खानची पत्नी गौरी खान हजेरी लावणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 सप्टेंबर : फिल्ममेकर करण जोहरचा बहिचर्चित शो म्हणजे ‘कॉफी विथ करण’. या टॉक शोमध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. सध्या कॉफी विथ करणचा 7 वा सीझन सुरु असून आगामी भागात शाहरुख खानची पत्नी गौरी खान हजेरी लावणार आहे. यासोबत संजीव कपूरची पत्नी महीप कपूर आणि चंकी पांडेची पत्नी भावना पांडे या भागात उपस्थित राहणार आहे. नुकतंच 12व्या भागाचा प्रोमो समोर आला आहे. ‘कॉफी विथ करण 7’ च्या आगामी भागात प्रोमो प्रदर्शित झाला आहे. प्रोमोमध्ये गौरी, भावना, महीप अनेक गप्पा, मस्ती, गुपितं सांगाना दिसत आहेत. यावेळी करण गौरीला मुलगी सुहानाविषयी प्रश्न विचारतो. करण गौरीला विचारतो की, सुहानाला कोणत्या डेटिंग टीप्स द्यायला आवडेल. यावर गौरी म्हणते, ‘एकाच वेळी दोन मुलांना डेट करु नये’. गौरीचं हे उत्तर ऐकूण सगळेच हसायला लागतात. करण पुढे विचारतो की, तुझ्या आणि शाहरुखच्या लव्हस्टोरीवर एखाद्या चित्रपटाचं नाव द्यायचं झालं तर कोणतं नाव देशील. यावर गौरी म्हणते, ‘दिल वाले दुल्हमनिया ले जायेंगे’. तिला हा चित्रपट खूप आवडत असल्याचंही यावेळी गौरीने सांगितलं.

जाहिरात

करण जोहरने महीप कपूरला विचारले की, जर तुम्हाला चित्रपटाची ऑफर असेल तर तुम्हाला कोणत्या अभिनेत्यासोबत काम करायला आवडेल. उत्तरात महीप म्हणते – मला वाटते माझी आणि हृतिक रोशनची जोडी एकत्र छान दिसेल. महीपचे म्हणणे ऐकल्यानंतर करण म्हणतो की, तुझ्यात हे सांगण्याची खूप हिंमत आहे. दरम्यान, आगामी भागाचा प्रोमो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. खूप कालावधीपासून प्रेक्षक गौरी खानची वाट पाहत आहेत. अखेर आगामी भागात प्रेक्षकांना गौरी पहायला मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात