मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /करीनाचा मुलगा पहिल्यांदा आला कॅमेरासमोर; जहाँगीरचा फोटो व्हायरल

करीनाचा मुलगा पहिल्यांदा आला कॅमेरासमोर; जहाँगीरचा फोटो व्हायरल

करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा दुसरा मुलगा जहाँगीर याचा पहिला फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे.

करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा दुसरा मुलगा जहाँगीर याचा पहिला फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे.

करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा दुसरा मुलगा जहाँगीर याचा पहिला फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे.

  मुंबई 23 ऑगस्ट: अभिनेत्री करिना कपूरने (Kareena Kapoor Khan) आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कपूर कुटुंबातली असली तरीही तिने स्वत: ती पुण्याई न वापरता आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांना आनंद दिला आहे. करिना आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी कायम चर्चेत असतात. त्यांच्या प्रेमप्रकरणापासून ते त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मापर्यंत सगळ्याच गोष्टी कायम चर्चेत राहिल्या आहेत. त्यांच्या कौटुंबिक सुटीचे फोटो (Holiday Photos), मोठा मुलगा तैमूर याचे फोटो हे प्रचंड व्हायरल होत असतात. पण दुसरा मुलगा झाल्यानंतर मात्र करिना आणि सैफने त्याला माध्यमांपासून दूर ठेवलं होतं. त्याच्या जन्मानंतर त्याचा एखादा चांगलासा फोटोही प्रसिद्ध झाला नव्हता. पण आता मात्र मालदीववरून सुटी संपवून करिना परतत असताना कलिना एअरपोर्टवर फोटोग्राफर विरल भयानीने (Photographer Viral Bhayani) जहाँगीरचा फोटो क्लिक केला असून तो त्याच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम हँडलवर प्रसिद्ध केला आहे. तैमूरच्या आधीच्या नानीने जहाँगीरला कडेवर घेतलं असून त्याच्या अंगावर निळ्या रंगाचा ड्रेस आहे. जहाँगीर (Jehangir) या फोटोमध्ये खूप सुंदर दिसतो आहे.

  सैफ अली खानचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सैफ, करिना, तैमूर आणि जहाँगीर हे चौघं मालदीवला गेले होते. तिथं सुट्टीचा आनंद लुटून ते परतत असताना एअरपोर्टवर जहाँगीरची पहिली झलक टिपण्यात विरल भयानीला यश आलं. या फोटोला“#saifalikhan #kareenakapoorkhan baby’s first proper picture as the family returns from Maldives in a private chartered flight. Seen along with Nurse #SRLata." अशी कॅप्शन दिली आहे ज्यात म्हटलंय सैफ अली खान आण करिना कपूर खानच्या मुलाचा पहिला व्यवस्थित फोटो ते जेव्हा खासगी चार्टर्ड विमानाने मालदीवहून परतले तेव्हा काढलेला. नर्स एसआर लतासोबत जहाँगीर दिसत आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात जहाँगीरचा जन्म झाला. सैफ करिनाने जहाँगीरचे फोटो प्रसिद्ध होऊ नयेत याची खूप काळजी घेतली होती. पण फोटोग्राफरने शेवटी जहाँगीरच्या चेहऱ्याची झलक फोटोमध्ये कैद करण्यात यश मिळवलं आहे. तिने तिचे अनुभव शेअर केल्याने अनेक महिला या पुस्तकाला चांगला प्रतिसाद देत आहेत.

  काँग्रेस आमदाराच्या मुलीचा ब्रालेस ड्रेसमध्ये हॉट अवतार, PHOTOS व्हायरल

  कामाबाबत बोलायचं तर करिनाने नुकतंच तिच्या दुसऱ्या बाळंतपणानंतर आपल्या दोन्ही बाळंतपणांच्या अनुभवांवर आधारित पुस्तक लिहिलं आहे. त्याचं प्रमोशन ती सध्या करते आहे. करिना आमीर खानसोबत लालसिंग चढ्ढा (Laal Singh Chaddha opposite Aamir Khan) या चित्रपटात दिसणार असून त्याचं दिग्दर्शन अद्वैत चंदन याने केलं आहे. इंग्रजी फॉरेस्ट गम्प या चित्रपटाचा हा अधिकृत हिंदी रिमेक आहे. करण जोहरच्या तख्त या सिनेमातही करिना काम करणार आहे.

  First published:
  top videos

   Tags: Kareena Kapoor, Kareena kapoor baby