2021 हे वर्ष बॉलिवूडसाठी खूपच अनोखं ठरलेलं आहे. या वर्षी अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटामुळे लोक आश्चर्यचकित झाले होते. अभिनेत्री सुष्मिता सेनने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल सोबत ब्रेकअप झाल्याची माहिती दिली होती.
अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा प्रियकर रोहमन शॉल यांच्या विभक्त झाल्याच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. सुष्मिताने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर रोहमन शॉलसोबतचा स्वतःचा एक फोटो पोस्ट केला होता आणि सांगितले होते की त्यांचं नातं फार पूर्वीपासून संपलेलं आहे, परंतु ते अजूनही चांगले मित्र म्हणून जोडलेले आहेत.
बॉलिवूडची दोन मोठी नावं असलेल्या अभिनेता आमिर खान आणि चित्रपट निर्माती किरण राव यांनी जुलै 2021 मध्ये एक निवेदन जारी करून त्यांच्या घटस्फोटाबाबत माहिती दिली. त्यांनी या वर्षी त्यांचं 15 वर्षांचं वैवाहिक आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.
दक्षिण चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने ऑक्टोबर 2021 मध्ये तिचा पती आणि अभिनेता नागा चैतन्यला घटस्फोट दिला. या जोडप्याने 2017 मध्ये लग्न केलं होतं.
टीव्ही इंडस्ट्रीतील दोन प्रसिद्ध कलाकार निशा रावल आणि करण मेहरा यांनी 2012 मध्ये लग्न केलं होतं. तथापि, जेव्हा त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला वेगळे होण्याची इच्छा उघड केली तेव्हा हे उघड झाले की दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी नव्हते. दोघांमध्ये बराच वाद झाला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार गायक आणि रॅपर यो यो हनी सिंगची पत्नी शालिनी सिंहने त्याच्यावर घरगुती हिंसाचार आणि विवाहबाह्य संबंधांचे आरोप केले होते. याच कारणामुळे या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
अभिनेत्री कीर्ती कुल्हारी हिने यावर्षी एप्रिलमध्ये तिचा पती आणि अभिनेता साहिल सहगल यांच्यापासून घटस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.