रसिका दुग्गल: रसिका दुग्गल तिच्या शानदार अभिनयातून सर्वांच्या मनावर राज्य करत आहे. सुपरहिट वेब सीरिज मिर्झापूर, आऊट ऑफ़ लव्ह यासारख्या बर्याच वेब सीरिजचा भाग आहे. हेच कारण आहे की तिला ओटीटी प्लॅटफॉर्मची राणी म्हटलं जातं.
श्वेता त्रिपाठी: मिर्झापूरची गोलू म्हणजेच श्वेता त्रिपाठीसुद्धा तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे ओटीटी जगावर राज्य करते. श्वेता त्रिपाठी ही मेड इन हेवन, गॉन गेम, लाख मे एक, द ट्रिप आणि ट्रिपलिंग सारख्या अनेक OTT प्रोजेक्टचा भाग आहे
सोभिता धुलीपाला: सोभिता धुलीपाला केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या जबरदस्त आकर्षक लुकसाठी देखील चर्चेत आहे. शोभिताने मेड इन हेवेनपासून ते बार्ड ऑफ ब्लड आणि घोस्ट स्टोरीज अशा बऱ्याच वेब सिरीजमध्ये काम केले आहे
अनुप्रिया गोयंका: पद्मावत, अॅक्शन थ्रिलर वॉर आणि टायगर जिंदा है, अशा चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अनुप्रियाने सेक्रेड गेम्स, क्रिमिनल जस्टीस, अभय, असुर आणि आश्रम सारख्या वेब प्रोजेक्टमध्ये काम केले
सयानी गुप्ता: सयानी गुप्ताने इंडस्ट्रीमध्ये स्वत: साठी खास स्थान कोरले आहे. फोर मोर शॉट्स प्लीज आणि इनसाईड एज सारख्या शोमध्ये तिच्या ऑनस्क्रीन परफॉरमेंसमुळे ती चर्चेत राहिली आहे
मिथिला पालकर: मिथिला पालकर हा हिंदी प्रेक्षकांसाठी खास वेबसीरिजचा चेहरा. तिची मालिका लिटिल थिंग्ज चांगलीच गाजली, या माध्यमातून तिने प्रेक्षकांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली
श्रिया पिळगावकर: श्रेया OTT जगात खूप सक्रिय आहेत. मिर्झापूर, द गॉन गेम ते 13 मसूरी आणि क्रॅकडाऊन अशा अनेक ओटीटी प्रोजेक्टमध्ये तिने काम केले आहे.