टिकटॉकने खूप जणांना एक व्यासपीठ दिलं, लोकप्रियता दिली. यातून अनेक जण स्टार झाले. पण त्यातल्या काहींना टिकटॉक बंद झाल्यावर नैराश्याने घेरलं.
Sameer Gaikwad: पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये समीर गायकवाड शिकत होता. म्युझिक व्हिडीओ आणि शॉर्ट व्हिडीओ बनवणारा समीर हा ब्लॉगर म्हणून तरुणांमध्ये लोकप्रिय होता. त्याची रेडलाईट डायरीज ही ब्लॉगवरील मालिका चांगलीच गाजली होती. तो टिकटॉक स्टार म्हणूनही तरुणांमध्ये लोकप्रिय होता. 21 फेब्रुवारी, 2020 ला त्याने रविवारी घरातील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
Siya Kakkar: सिया कक्कर ही फक्त 16 वर्षांची होती. खूप कमी वयातच तिने टिकटॉक स्टार म्हणून चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती.
Dazhariaa: डाझरिया लुसियाना येथील प्रसिद्ध व्लॉगर आणि टिकटॉक स्टार होती. तिचे इंस्टाग्राम आणि टिकटॉक या दोन्ही प्लॅटफॉर्म वर खूप सारे फॉलोवर्स होते. Dazhariaa ही DEE च्या नावाने टिकटॉकवर ओळखली जात होती.
Sandhya Chauhan: संध्या चौहान ही दिल्ली विद्यापीठात शिकत होती. भारत सरकारने चिनी apps वर बंदी आणल्यामुळे 18 वर्षीय संध्याने नैराश्यात येऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
Pooja Chavan - पूजा चव्हाण ही 22 वर्षीय टिकटॉक स्टार होती. पुण्यातील वानवडी परिसरातील एका इमारतीच्या बाल्कनीतून उडी मारून तिने आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येमागे राजकीय कनेक्शन असल्याचं बोललं जात आहे.
Rafi Sheikh: टिकटॉक स्टार रफी शेखने आंध्र प्रदेशच्या नेल्लोर येथे आपल्या घरी आत्महत्या केली होती. त्याच्या काही मित्रांनी त्याचा मानसिक छळ केल्याचा आरोप रफीच्या पालकांनी केला आहे