नेहा धूपिया, लीसा हेडन, अमृता अरोरा, श्रीदेवी यांसारख्या अनेक अभिनेत्री लग्नाआधी प्रेग्नेंट होत्या
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने घाईघाईत त्याची मैत्रीण नताशा स्टॅनकोविचशी साखरपुडा केला होता. त्यावेळी नताशा गर्भवती असल्याच्या बातम्या आल्या होत्या. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्री नेहा धुपियाने (Neha Dhupia) एका छोटेखानी खाजगी कार्यक्रमात बॉयफ्रेंड अंगद बेदीशी लग्न केले होते. असे वृत्त होते की ती लग्नाआधीच प्रेग्नेंट होती. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
आफ्रिकन मॉडेल आणि अभिनेत्री Gabriella Demetriades हिने देखील लग्नाशिवाय बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या मुलाला जन्म दिला आहे. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेत्री लीसा हेडन (Lisa Haydon) हिने ऑक्टोबर 2016 मध्ये लग्न केले होते आणि मे 2016 मध्ये बाळाला जन्म दिला होता. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोराचा (Amrita Arora) शकील लडक (Shakeel Ladak) बरोबर अचानक लग्न करण्याचा निर्णय आश्चर्यकारक होता. लग्नाच्या काही काळानंतर दोघांनी प्रेग्नन्सीची घोषणा केली होती (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेत्री अॅमी जॅक्सनने (Amy Jackson) तिचा बॉयफ्रेंड जॉर्ज पॅनियोतोशी साखरपुडा केल्यानंतर लगेचच प्रेग्नन्सीची बातमी दिली होती (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा (Konkona Sen Sharma) आणि अभिनेता रणवीर शौरी यांनी दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर एका खाजगी समारोहात लग्न केले. त्यानंतर लगेचच त्यांनी प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. मात्र त्यांनी बाळाबाबत कधी कोणाशी बातचीत केली नाही आहे. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) आणि तिचे पती चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची प्रेमकथा खुल्या पुस्तकासारखीच आहे. अशा मोजक्या सेलिब्रिटींपैकी श्रीदेवी एक होती जिने हे मान्य केले होते, की ती लग्नाआधी गर्भवती आहे. श्रीदेवीने बोनीशी लग्न केले तेव्हा ती सात महिन्यांची गरोदर होती. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) आणि वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड यांनी काही वर्ष डेट केले होते. लग्नाशिवाय नीना आणि रिचर्ड यांना एक मुलगी आहे (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेत्री सारिकाने लग्नाआधी मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर दोन वर्षांनी तिने कमल हसनशी लग्न केले. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)