2021 मध्ये अशाच काही वेब सीरिज रिलीज झाल्या, ज्यांनी बोल्ड सीन्समुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं होतं. यामध्ये 'बेकाबू 2' आणि 'गंदी बात 6' सारख्या वेब सीरिजचा समावेश आहे. 2021 मध्ये रिलीज झालेल्या आणि त्यांच्या बोल्ड कंटेंटमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या त्या 5 बोल्ड वेब सिरीजबद्दल माहिती घेऊयात.
'बेकाबू' च्या यशानंतर ALT बालाजीने 'बेकाबू सीझन 2' मध्ये कियानची कथा पुढे नेण्याचा निर्णय घेतला. यामध्ये प्रिया बॅनर्जी, पौलोमी दास आणि सुभा राजपूत यांसारख्या अभिनेत्रींनी काम केलेलं आहे. यामध्ये अनेक इंटिमेट सीन्स आहेत.
OTT प्लॅटफॉर्म ULLU हे बोल्ड कंटेंटसाठी ओळखलं जातं. या वर्षी त्यांनी 'कविता भाभी सीझन 3' सह अनेक वेब सीरिज आणल्या. मालिकेचे काही भाग 2020 च्या उत्तरार्धात तर काही 2021 मध्ये रिलीज झाले.
'चरम सुख' ही OTT प्लॅटफॉर्म ULLU ची सर्वात प्रसिद्ध वेब सिरीज आहे. जवळजवळ प्रत्येक महिन्यात या मालिकेचा एक नवीन भाग प्रदर्शित केला जातो आणि 2021 मध्ये OTT प्लॅटफॉर्मवर 'चरम सुख' चे अनेक भाग प्रदर्शित झाले.
अनेक यशस्वी सीझननंतर 'गंदी बात' चा सीझन 6 यावर्षी जानेवारीमध्ये रिलीज झाला होता. दर्शकांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच त्यात कंटेंट पाहायला मिळाला.
या यादीत 'ULLU' ची आणखी एक वेब सिरीज आहे. 'लव्हली मसाज पार्लर' मध्ये अनेक बोल्ड सीन्स दाखवलेले आहेत.