घटस्फोट हा नेहमीच वेदनादायी असतो. पण तितकाच तो आर्थिक संकटातही टाकतो. बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागली होती. फक्त पैसैच नाहीतर बंगले आणि गाड्यांवरही पाणी सोडावं लागलं होतं.
अमृता सिंग आणि सैफ अली खान: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानने (Saif Ali Khan)1991 मध्ये अमृता सिंग (Amrita Singh) सोबत लग्न केलं होतं. पण लग्नाच्या 13 वर्षानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा सैफला अमृता आणि मुलांसाठी मोठी रक्कम द्यावी लागली होती. त्याने स्वतः एका मुलाखतीत त्यावेळी सांगितलं होतं की त्याला अमृताला 5 कोटी रुपये देणं आहे. त्यातील अर्धी रक्कम आधीच दिली आहे. तर उर्वरीत रक्कम लवकरच देणार असून मुलगा 18 वर्षांचा होईपर्यंत 1 लाख प्रतिमहिना देणार असल्याचही त्याने सांगितलं होतं.
करिश्मा कपूर आणि संजय कपूर: अभिनेत्री करिश्मा कपूरने (Karisma Kapoor) 2003 मध्ये संजय कपूरसोबत विवाह केला होता. पण 2014 साली त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सध्या ही केस कोर्टात सुरू आहे. याबदल्यात करिश्माला संजयच्या वडिलांचं घर देण्यात येणार आहे. याशिवाय करिश्माला एक मुलगा आणि मुलगी आहे. त्यांच्यासाठी संजयला 14 कोटी रुपयांचं बाँड खरेदी करावं लागेल व प्रतिमहा 10 लाख रुपये द्यावे लागतील.
फरहान अख्तर आणि अधुना भबानी: लग्नाच्या 15 वर्षांनंतर फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि अधुना भबानी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या बदल्यात अधुनाला दोघांच्या नावावर असलेला एक बंगला देण्यात आला.
संजय दत्त आणि रिया पिल्लई: मान्यता दत्तशी विवाह करण्यापूर्वी, संजय दत्तने (Sanjay Dutt) मॉडेल रिया पिल्लईसोबत विवाह केला होता. त्यांनी 1998 मध्ये विवाह केला होता. ते 2008 मध्ये वेगळे झाले. यावेळी रियाला 8 कोटी रुपयांचा एक फ्लॅट आणि एक कार ही देण्यात आली होती.
प्रभु देवा और रामलता: प्रसिद्ध कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक प्रभु देवा आणि रामलथाने 2010 साली वेगळं होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा प्रभूदेवाने दोन्ही मुलांच्या नावावर करोडोंची संपत्ती केली होती. याशिवाय दरमहा 10 लाख रुपये देण्याचं सांगितलं होतं. या प्रॉपर्टीमध्ये 3 रेसिडेंशियल प्रॉपर्टीचा समवेश आहे. या बदल्यात रामलथाने प्रभूदेवावरील सगळ्या केसेस मागे घेतल्या होत्या.