Home /News /entertainment /

Friendship Day 2022: बॉलिवूडच नाही तर मराठीतील 'ही' गाणीही आहेत खूपच खास, पाहा VIDEO

Friendship Day 2022: बॉलिवूडच नाही तर मराठीतील 'ही' गाणीही आहेत खूपच खास, पाहा VIDEO

उद्या ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार. ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा 'फ्रेंडशिप डे' अर्थात मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. ऑगस्ट महिन्यातला हा रविवार मित्र-मैत्रिणींसाठी खूप खास असतो.

  मुंबई, 6 ऑगस्ट : उद्या ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार. ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा 'फ्रेंडशिप डे' (Friendship Day 2022) अर्थात मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. ऑगस्ट महिन्यातला हा रविवार मित्र-मैत्रिणींसाठी खूप खास असतो. आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त आणखी एक कुटुंब म्हणजे आपले मित्र-मैत्रिणी असतात. आपल्या आयुष्यात त्यांच्यासाठी किती खास जागा आहे आणि ते आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे सांगण्यासाठी हा दिवस मानला जातो. प्रत्येकजण आपलं मैत्री प्रेम वेगवेगळ्या प्रकारे दर्शवतात. यापैकी मित्रांना खास दोस्तीची गाणी शेअर करुनही अनेकजण 'फ्रेंडशीप डे' खास बनवतात. चला तर मग पाहूया मित्रांसाठीची खास गाणी कोणती आहेत. बॉलिवूडपेक्षाही मराठीतील काही गाणी मैत्रीसाठी खूपच खास आहेत. यामध्ये 'ही दोस्ती तुटायची नाय' हे गाणं तर पहिलं ओठांवर येतं. लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांच्या 'धडाकेबाज' चित्रपटातील हे गाणं आजही मैत्रीसाठी खूपच स्पेशल आहे. आजही लोकं हे गाणं मित्रांना समर्पित करतात. 'दुनियादारी' चित्रपटातील 'जिंदगी' हे गाणं देखील मैत्रीसाठी समर्पित करु शकतो. स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सुशांत शेलार यांचं हे गाणं 'फ्रेंडशिप डे' ला आणखीनच खास बनवेल. त्यामुळे हे गाणं तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करुन त्यांना स्पेशल फील करवून देऊ शकता.
  नादखुळा म्युझिकनं बनवलेलं 'आपली यारी' हे गाणंही तुम्ही तुमच्या मित्रांसाठी शेअर करुन शकता. या गाण्यामध्ये मित्र आयुष्यात किती महत्त्वाचे असतात हे पहायला मिळतं. 'क्लासमेट' या चित्रपटातील ''तेरी मेरी यारीया' हे गाणंही तरुणाईला वेड लावणारं आहे. 'क्लासमेट' चित्रपटातील आणखी एका गाणं मैत्री खास असल्याचं दाखवून देतं. या गाण्याचं नाव 'बिनधास्त बेधडक' असं आहे. हे गाणं खूप एनर्जेटिक असून खास मित्र आयुष्यात किती गरजेचं असतात यावरुन समजतं. सर्वांना मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Friendship, Social media, Song, Viral

  पुढील बातम्या